रत्नागिरी, 9 ऑक्टोबर, (हिं. स.) : येथील श्रीमान मंगेश बापुजी तोरगलकर कनिष्ठ महाविद्यालयात आंतरशालेय व आंतरमहाविद्यालयीन अभिवाचन आणि निबंध स्पर्धा उत्साहात पार पडली. यात शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते.
स्पर्धेचे उद्घाटन कनिष्ठ महाविद्यालय समिती प्रमुख पाटणकर व उपमुख्याध्यापिका श्रीमती जाधव यांच्या उपस्थितीत झाले. अभिवाचन स्पर्धेचे परीक्षण श्रीमती दीप्ती कानविंदे व अमोल मयेकर यांनी, तरनिबंध स्पर्धेचे परीक्षण बोटके यांनी केले. शिर्के प्रशालेचे शिक्षक व र. ए. सोसायटीचे माजी सहकार्यवाह देवळेकर यांनी त्यांच्या मातोश्री कै. सुभद्रा देवळेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बक्षिसाची रक्कम प्रायोजित केली. बक्षीस वितरण समारंभासाठी कनिष्ठ महाविद्यालय गुणवत्ता सुधार समिती प्रमुख वालावलकर, मुख्याध्यापक के. डी. कांबळे, श्री. देवळेकर आदी उपस्थित होते.
स्पर्धांचा गुणानुक्रमे निकाल असा : निबंध स्पर्धा- गट १ (इ. ९ वी – १० वी) : स्वरूपा भाटवडेकर (जीजीपीएस), तीर्था दीपक मयेकर (पटवर्धन हायस्कूल), कु. वेदा मांडवकर (महिला विद्यालय); गट २ (इ. ११ वी – १२ वी) : प्रणव हातिसकर (अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय), मुग्धा ढोर्लेकर (एसएमबीटी), कोमल वाईकर (एसएमबीटी).
अभिवाचन स्पर्धा- गट १ : प्रथम– पूर्वा जोशी, पूर्वा निकम, पर्णिका परांजपे (फाटक हायस्कूल), द्वितीय– वैष्णवी चौगुले, शताक्षी भुर्ते (रा. भा. शिर्के प्रशाला), तृतीय– आदिती सावंत, भार्गवी गोखले, आरुणी दुधाळे (रा. भा. शिर्के प्रशाला); गट २ : प्रथम– बिल्वा रानडे (वि. स. गांगण आणि केळकर कॉलेज), द्वितीय– वीणा काळे, अर्पिता बापट, वैदेही वैद्य (अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय), तृतीय– स्वरदा केळकर, श्रिया केळकर, श्रावणी खांडेकर (अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय).
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी