बीड - गेवराईत ११ प्रभाग; पहिल्याच प्रभागात सर्वसाधारणला संधी
बीड, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। गेवराई येथील नगर परिषदेच्या मागील निवडणुकीत नऊ प्रभाग होते. यातील प्रभाग दोनमध्ये तीन नगरसेवक, तर इतर आठ प्रभागांत १६ असे एकूण १९ नगरसेवक होते. दरम्यान, यावेळी ११ प्रभाग रचना असून, २२ नगरसेवक असणार आहेत. गेवराई येथील नगर
अ


बीड, 9 ऑक्टोबर (हिं.स.)।

गेवराई येथील नगर परिषदेच्या मागील निवडणुकीत नऊ प्रभाग होते. यातील प्रभाग दोनमध्ये तीन नगरसेवक, तर इतर आठ प्रभागांत १६ असे एकूण १९ नगरसेवक होते. दरम्यान, यावेळी ११ प्रभाग रचना असून, २२ नगरसेवक असणार आहेत.

गेवराई येथील नगर परिषद सदस्य पदासाठीची आरक्षण सोडत गेवराई नगर परिषद सभागृहात पार पडली. उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, मुख्याधिकारी विक्रम मांडुरके यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली.

गेवराई येथील विमला माध्यमिक विद्यालयातील इयत्ता पाचती इयत्तेतील विद्यार्थी ओम साई गर्ने, विश्वराज येवले यांच्या हस्ते चिठ्ठचा काढण्यात येऊन आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यावेळी गेवराई येथील सर्व पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

.

प्रभाग १ - सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग २ - ओबीसी, सर्वसाधारण महिला, प्रभाग ३० ओबीसी, सर्वसाधारण महिला, प्रभाग ४ ओबीसी महिला, सर्वसाधारण, प्रभाग ५-ओबीसी, सर्व साधारण महिला, प्रभाग

६- अनुचित जाती, सर्वसाधारण महिला, प्रभाग ७- अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण, प्रभाग ८- अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण, प्रभाग २-सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग १०- ओबीसी महिला, सर्वसाधारण, प्रभाग ११- ओबीसी महिला, सर्वसाधारण अशी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande