छत्रपती संभाजीनगर, 9 ऑक्टोबर (हिं.स.)।जालना शहरातील मंठा चौफुली परिसरात नव्याने सुरू झालेल्या “हॉटेल शेतकरी” या उपहारगृहाचा शुभारंभ सोहळा अंदाज समिती प्रमुख तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या शुभहस्ते पार पडला.
स्थानिक तरुणांनी रोजगाराच्या क्षेत्रात उतरून स्वावलंबी होणे ही आनंदाची बाब आहे. अशा उपक्रमांमुळे स्थानिकांना रोजगार मिळून आर्थिक उन्नतीस हातभार लागतो.” असे जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा विधी मंडळ अंदाज समितीचे प्रमुख अर्जुन खोतकर यांनी यावेळी सांगितले. या प्रसंगी शिवसेना शहरप्रमुख विष्णू पाचफुले, माजी सभापती पांडुरंग डोंगरे, शहरातील मान्यवर, व्यापारी वर्ग, स्थानिक नागरिक तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुयोग्य आयोजन करण्यात आले होते.हॉटेल शेतकरी येथे ग्रामीण स्वाद, पारंपरिक पदार्थ आणि कुटुंबीयांसाठी आकर्षक व स्वच्छ वातावरण यामुळे हे ठिकाण शहरातील खाद्यप्रेमींसाठी एक नवीन पर्याय ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis