छ. संभाजीनगरात उद्योग संरेखिते आणि नवयुगीन अल्पकालीन व्यवसाय अभ्यासक्रमाचा शुभारंभ
छत्रपती संभाजीनगर, 9 ऑक्टोबर (हिं.स.)।हुतात्मा जनार्धन मामा नागापूरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना येथे ‘उद्योग संरेखिते आणि नवयुगीन अल्पकालीन व्यवसाय अभ्यासक्रमाचा शुभारंभ हुतात्मा जनार्धन मामा नागापूरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थ
Q


छत्रपती संभाजीनगर, 9 ऑक्टोबर (हिं.स.)।हुतात्मा जनार्धन मामा नागापूरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना येथे ‘उद्योग संरेखिते आणि नवयुगीन अल्पकालीन व्यवसाय अभ्यासक्रमाचा शुभारंभ हुतात्मा जनार्धन मामा नागापूरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना येथे उद्योग संरेखिते आणि नवयुगीन अल्पकालीन व्यवसाय अभ्यासक्रमाचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते आभासी पद्धतीने संपन्न झाला. जालना येथील कार्यक्रम स्थळी अंदाज समिती प्रमुख तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी उपस्थित विद्यार्थी व प्रशिक्षणार्थींशी संवाद साधत त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. आमदार अर्जुनराव खोतकर म्हणाले, “औद्योगिक प्रशिक्षण ही केवळ नोकरी मिळवण्याची प्रक्रिया नाही, तर स्वावलंबन आणि आत्मनिर्भरतेकडे नेणारा मार्ग आहे. प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याने आपल्यामधील गुण ओळखून त्यावर मेहनत घेतली पाहिजे. आज सरकारकडून विविध उद्योगधंद्यांसाठी अनेक योजना उपलब्ध आहेत. त्या योजनांचा योग्य वापर करून तरुणांनी स्वतःचा व्यवसाय, उद्योग सुरू करून रोजगारनिर्माते बनावे. ‘मेक इन इंडिया’, ‘स्टार्टअप इंडिया’ आणि ‘स्किल इंडिया’ ही उपक्रम फक्त घोषवाक्य म्हणून न पाहता प्रत्यक्षात उतरवणे हे नव्या पिढीचे कर्तव्य आहे. जालना जिल्ह्यातील युवकांकडे प्रचंड क्षमता आहे — योग्य प्रशिक्षण, दृढ इच्छाशक्ती आणि मार्गदर्शन मिळाल्यास ते केवळ रोजगार शोधणारे नव्हे तर रोजगार निर्माण करणारे उद्योजक ठरतील.” “या संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांनी अभ्यासक्रमादरम्यान तांत्रिक कौशल्यांसह प्रामाणिकपणा, टीमवर्क आणि नवोपक्रमशीलता जोपासली पाहिजे. हेच गुण तुम्हाला उद्योगजगतामध्ये वेगळं स्थान मिळवून देतील,” असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी श्रीमती अशिमा मित्तल, महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर, प्राचार्य प्रवीण कुमार उखळीकर, मुख्याध्यापक सौ. रजनी शेळके, जिल्हा व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी अतुल केसरकर, केशव कानपुडे, नंदकिशोर जेथलिया, शिंदे साहेब,उद्योग भारतीचे पंकज कासलीवाल, कापसे सर (आयटीआय) तसेच शिक्षकवृंद व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande