छ. संभाजीनगर : शिवसेनेने चालवली उद्धव ठाकरेंच्या मोर्चाची तयारी
छत्रपती संभाजीनगर, 9 ऑक्टोबर (हिं.स.)।हंबरडा मोर्चानिमित्तशिवसेना संभाजीनगर पश्चिम ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होणारा हा मराठवाडाव्यापी मोर्चा विराट झाला पाहिजे, यासाठी पश्चिम ग्राम
अ


छत्रपती संभाजीनगर, 9 ऑक्टोबर (हिं.स.)।हंबरडा मोर्चानिमित्तशिवसेना संभाजीनगर पश्चिम ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होणारा हा मराठवाडाव्यापी मोर्चा विराट झाला पाहिजे, यासाठी पश्चिम ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या संख्येने सामील झाले पाहिजे, अशी सूचना यावेळी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

याप्रसंगी सहसंपर्कप्रमुख अनिल चोरडिया, उपजिल्हाप्रमुख अरविंद धिवर, तालुकाप्रमुख विष्णू जाधव, तालुका संघटक बाळासाहेब कार्ले, शहरप्रमुख विशाल खंडागळे,महेंद्र खोतकर, गणेश नवले व कपिंद्र पेरे उपस्थित होते.

तसेच हंबरडा मोर्चा निमित्त गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन येथे शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक त्यांनी घेतली.याप्रसंगी सहसंपर्क संघटक अनिल चोरडिया, उपजिल्हाप्रमुख अंकुश सुंब, तालुकाप्रमुख सुभाष कानडे, दिनेश मुथा, विधानसभा संघटक मनाजी मिसाळ, तालुका संघटक मनोज गायके,युवासेना जिल्हाधिकारी विठ्ठल पाटील डमाळे व उपजिल्हाधिकारी अक्षय साठे उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande