परळी नगरपरिषदेत नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव
- आरक्षणाच्या सोडतीत 18 जागा महिलांसाठी बीड, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। बीड जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या परळी वैजनाथ नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आरक्षणाच्या सोडतीत 18 जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. परळी वैजनाथ नगरपरिषदेच्या २०२५
परळी नगरपरिषदेत नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव


- आरक्षणाच्या सोडतीत 18 जागा महिलांसाठी

बीड, 9 ऑक्टोबर (हिं.स.)।

बीड जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या परळी वैजनाथ नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आरक्षणाच्या सोडतीत 18 जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत.

परळी वैजनाथ नगरपरिषदेच्या २०२५ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. १७प्रभाग, ३५ सदस्य संख्या असलेल्या परळी नगरपरिषदेत नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिलेसाठी सुटले आहे येणाऱ्या नगरपरिषदेत १८ जागा महिलांसाठी आरक्षित असणार आहेत

यापूर्वी परळी नगरपरिषदेची निवडणूक नोव्हेंबर २०१६ मध्ये झाली होती. २०२१ पासून निवडणूक न झाल्याने ४ वर्षापासून नगरपरिषदेवर प्रशासकराज होते. उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, नगरपरिषद मुख्याधिकारी अरविंद कांबळे यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत कार्यक्रम झाला.

शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिट्ठी काढून प्रभागाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. १७ प्रभाग व ३५ सदस्य असलेल्या परळी नगरपरिषदेत १८ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. अनुसूचित जातीसाठी ६ प्रभाग, अनुसूचित जमाती साठी १ प्रभाग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी ९ जागा परळी नगरपरिषदेत असणार आहेत. अनुसूचित जातीतील ३ जागा महिलांसाठी, अनुसूचित जमाती खुला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गात महिलांसाठी ५ जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. तर खुल्या प्रवर्गात ९ प्रभाग असतील. सभागृहात नगरपरिषदेच्या झालेल्या सोडत कार्यक्रमात सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande