अमरावती : मनपा आयुक्तांकडून विविध भागांची पाहणी
अमरावती, 9 ऑक्टोबर (हिं.स.) अमरावती महानगरपालिका आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांनी आज शहरातील विविध भागातील स्वच्छतेची पाहणी केली. शहर स्वच्छतेसंदर्भात महानगरपालिका प्रशासन सातत्याने कार्यरत असून, त्याच अनुषंगाने आयुक्‍तांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊ
पंचवटी, पीडीएमसी, हॉलीक्रॉस शाळा व आय.एम.ए. हॉल परिसरातील स्वच्छतेची पाहणी


अमरावती, 9 ऑक्टोबर (हिं.स.) अमरावती महानगरपालिका आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांनी आज शहरातील विविध भागातील स्वच्छतेची पाहणी केली. शहर स्वच्छतेसंदर्भात महानगरपालिका प्रशासन सातत्याने कार्यरत असून, त्याच अनुषंगाने आयुक्‍तांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या पाहणीत पंचवटी परिसर, पीडीएमसी परिसर, हॉलीक्रॉस शाळा परिसर तसेच कॅंम्‍प रोड येथील आय.एम.ए. हॉल परिसर या ठिकाणांचा समावेश होता. पाहणीदरम्यान आयुक्‍तांनी रस्त्यावरील कचरा व्यवस्थापन, ओला-सुक्‍का कचरा विभाजन, डंपिंग स्थळांची स्थिती, तसेच नागरिकांच्या तक्रारींची नोंद घेतली. आयुक्तांनी संबंधित झोन अधिकारी, स्वच्छता निरीक्षक व विभागीय कर्मचाऱ्यांना परिसरातील स्वच्छतेबाबत अधिक दक्ष राहण्याचे, तसेच कचरा वेळेवर उचलून योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याचे निर्देश दिले. तसेच, ज्या ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे निर्माण झाले आहेत, तेथील साफसफाई तात्काळ करण्याचे आदेशही त्यांनी दिले व काही नियमित ठिकाणी कचरा स्पॉट चे सौंदर्यीकरण करण्याचे निर्देश IEC अंतर्गत काम बघणारे प्रतिनिधी यांना दिले. यावेळी आयुक्‍तांनी नागरिकांनाही आवाहन केले की, स्वच्छता ही सर्वांची जबाबदारी आहे. नागरिकांनी कचरा रस्त्यावर टाकू नये, तसेच ओला आणि सुका कचरा वेगळा करून महानगरपालिकेच्या वाहनांना द्यावा. शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. आयुक्‍तांच्या या प्रत्यक्ष पाहणीमुळे महानगरपालिका प्रशासनाच्या स्वच्छता मोहिमेला नवे बळ मिळाले असून, शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या पाहणी दरम्‍यान अतिरिक्‍त आयुक्‍त शिल्पा नाईक, वैद्यकीय अधिकारी (स्‍वच्‍छता) डॉ.अजय जाधव, जेष्‍ठ स्‍वास्‍थ निरीक्षक विजय बुरे, स्वच्छ भारत मिशन अमरावती मनपा शहर समन्‍वयक श्र्वेता बोके, स्‍वास्‍थ निरीक्षक व मनपा कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande