नांदेड - येरगी येथे सार्वजनिक बतुकम्मा उत्सव उत्साहात संपन्न
नांदेड, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। येरगी येथे सार्वजनिक बतुकम्मा उत्सव उत्साहात संपन्न झाला महिला पोलिसांनीही पारंपरिक नृत्याचा आनंद घेतला. शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. देगलूर तालुक्यातील चालुक्य कालीन नगरी येरगी ही गाव तेलंगणाच्या अगदी सीमेवर
अ


अ


नांदेड, 9 ऑक्टोबर (हिं.स.)।

येरगी येथे सार्वजनिक बतुकम्मा उत्सव उत्साहात संपन्न झाला

महिला पोलिसांनीही पारंपरिक नृत्याचा आनंद घेतला.

शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.

देगलूर तालुक्यातील चालुक्य कालीन नगरी येरगी ही गाव तेलंगणाच्या अगदी सीमेवर असल्याने पूर्वीपासूनच तेलंगणातील अनेक सण,उत्सव या गावात साजरा केला जातो. महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन्ही राज्याची पारंपरिक संस्कृतीचे प्रदर्शन विविध सणांच्या माध्यमातून दिसून येते.यात दसरा कालावधीत बतुकम्मा सण सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. बतुकम्मा सण हा एक सार्वजनिक उत्सवा प्रमाणे साजरा केला जावा हा हेतू मनात घेऊन गावचे सरपंच संतोष पाटील यांनी येरगी गावातील व परिसरातील महिलांसाठी बतुकाम्मा सण साजरा करण्यासाठी एक मोठे व्यासपीठ निर्माण करून दिले .

यावर्षीचा सार्वजनिक बतुकाम्मा उत्सवाचे हे पहिले वर्ष होते.

तेलगू भाषिक समाजाचा सांस्कृतिक आणि पारंपरिक असा बतुकम्मा सण येरगी मध्ये गावातील हनुमान मंदिर परिसरातील भव्य पटांगणावर मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात आला.

सार्वजनिक बतकम्मा महोत्सवाच्या निमित्ताने गावातील माता-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. महिलांसाठी खास बतुकम्मा सजावट स्पधेर्चे आयोजन करण्यात आले होते. नैसर्गिक फुलांच्या माध्यमातून साकारलेल्या रंगीबेरंगी बतुकम्मांनी मंदिर व परिसर सुगंधित झाला होता. सौंदर्य, सृजनशीलता आणि पारंपरिकतेच्या निकषांवर परीक्षकांनी सजावटींचे मूल्यमापन केले. विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची सोय करण्यात आली होती, तर निकाल दिवाळीला जाहीर होणार आहे.

या प्रसंगी संतोष पाटील म्हणाले की कोणत्याची गावाचा विकास साधायचा असेल तर गावातील महिला समोर आले तरच विकास शक्य आहे. महिलांना या सणाच्या माध्यमातून एकत्र आणून त्यांच्यात एकोपा वाढीस आणून गावातील विविध प्रकारच्या विकास कामांची माहिती दिली. तसेच त्यांचा सार्वजनिक सहभाग किती महत्वाचा आहे हे सांगितले.

यानंतर गावचे प्रमुख सौ. संगीता मठवाले यांनी बतुकाम्मा चे गीत सादर केले ज्यावर गावातील महिलांनी बतुकाम्मा च्या सभोवती वर्तुळाकार आकारात पारंपरिक नृत्य केले. या गीतातून व नृत्यातून माझ्या गावाला धनधान्याने समृद्ध ठेव अशी मागणी गौरी रुपातील देवीकडे केली जाते.

पूजन, भक्तिगीते, महिलांसाठीच्या स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम मंदिर परिसरातमहिलांचा उत्सव असल्याने महिला पोलिस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी आले होते. संपूर्ण महिलांचे पारंपरिक नृत्य पाहून त्यांनीही नृत्यात सहभागी झाल्या.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande