स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी शिवसैनिकांनी एकजुटीने लढावे, शिवसेना नेत्यांचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा स्तंभ पूजन सोहळा छत्रपती संभाजीनगर, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा स्तंभ पूजन सोहळा संपन्न झाला. या कार्यालयाच्या स्थापनेमुळे शिवसेनेच्या संघटनात्मक का
अ


छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा स्तंभ पूजन सोहळा

छत्रपती संभाजीनगर, 9 ऑक्टोबर (हिं.स.)।

छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा स्तंभ पूजन सोहळा संपन्न झाला. या कार्यालयाच्या स्थापनेमुळे शिवसेनेच्या संघटनात्मक कार्याला नवी ऊर्जा आणि दिशा मिळणार आहे. स्थानिक पातळीवरील जनतेच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर तत्काळ उपाययोजना करण्यासाठी हे कार्यालय प्रभावी केंद्र ठरेल, असे शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांनी सांगितले.

या प्रसंगी नेत्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी शिवसैनिकांनी एकजुटीने आणि निष्ठेने कार्य करावे, जनतेच्या मनात विश्वास निर्माण करून शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी पालकमंत्री संजय शिरसाट, आ.प्रदीप जैस्वाल, माजी आ.अण्णासाहेब माने, मराठवाडा विभागीय सचिव अशोक पटवर्धन, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, भरतसिंग राजपूत, शहरप्रमुख विश्वनाथ राजपूत, महिला आघाडीच्या हर्षदा शिरसाट, संपर्क संघटक प्रतिभा जगताप, जिल्हा संघटक शिल्पाराणी वाडकर, महानगर संघटक शारदा घुले, शहर संघटक संगीता बोरसे यांच्यासह जिल्हा, तालुका आणि शहरातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande