संस्कृती बालगुडेच्या 'संभवामी युगे युगे'साठी अभिनेता सुमित राघवन देणार आवाज
मुंबई , 10 नोव्हेंबर (हिं.स.)।मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री संस्कृती बालगुडेने काही दिवसांपूर्वी एक खास घोषणा करून डान्स ड्रामा असलेल्या ‘संभवामी युगे युगे’ याची ओळख प्रेक्षकांना करून दिली. हा एक डान्स ड्रामा जरी असला तरी कृष्णाची विविध रूप यातू
संस्कृती बालगुडेच्या 'संभवामी युगे युगे'साठी अभिनेता सुमित राघवन देणार कृष्णाचा आवाज


मुंबई , 10 नोव्हेंबर (हिं.स.)।मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री संस्कृती बालगुडेने काही दिवसांपूर्वी एक खास घोषणा करून डान्स ड्रामा असलेल्या ‘संभवामी युगे युगे’ याची ओळख प्रेक्षकांना करून दिली. हा एक डान्स ड्रामा जरी असला तरी कृष्णाची विविध रूप यातून ती साकारणार आहे. या खास प्रोजेक्टसाठी मराठी-हिंदी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये चर्चेत असलेलं नाव जोडलं गेलं आहे. संस्कृतीने सोशल मीडियावर अभिनेता सुमित राघवन सोबत फोटो शेयर करत याबद्दल सांगितल आहे. कृष्ण रुपात दिसणाऱ्या संस्कृतीच्या या रूपाला तितकंच साजेसा आवाज देण्यासाठी आता अभिनेता सुमित राघवन या प्रोजेक्टचा एक भाग होताना दिसणार आहे.

संस्कृतीचा कृष्णरूपाचं सोशल मीडियावर एवढं कौतुक झालं की आता प्रेक्षकांना संभवामी युगे युगेची खूप उत्सुकता आहे. लवकरच हा डान्स ड्रामा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं कळतंय. या बद्दल बोलताना संस्कृती सांगते आयुष्यातलं हे स्वप्नवत काम आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण या इंडस्ट्रीत येण्याआधीपासून मी सुमित राघवन दादाची चाहती होती आणि आता माझ्या मनाच्या अगदी जवळच्या प्रोजेक्टसाठी आम्ही सोबत काम करतोय हे माझ्यासाठी खूप खास आहे. तो एक उत्तम अभिनेता तर आहे, पण माणूस म्हणून त्याची एक वेगळी बाजू या निमित्तानं अनुभवता आली. संभावामी युगे युगेसाठी जेव्हा आम्ही कृष्णाचा आवाज कोण देणार यावर विचार करत होतो तेव्हा मनात हे आलेलं पहिलं नाव होतं आणि सुमितदादा हे माझ्या अत्यंत जवळच्या प्रोजेक्टसाठी कृष्णासाठी त्याचा आवाज देतोय हे एका स्वप्नापेक्षा कमी नाही. म्हणून माझ्यासाठी फॅन मोमेंट ते सुमितदादा सोबत काम करण्याची संधी हा प्रवास सुंदर होता.

संभवामी युगे युगे या डान्स ड्रामासाठी अभिनेता सुमित राघवन याने कृष्णाचा आवाज दिला असून ही गोष्ट त्याचासाठी तितकीच खास आहे. याबद्दल बोलताना सुमित सांगतो जेव्हा संस्कृतीचा पहिल्यांदा या प्रोजेक्ट्साठी फोन आला आणि तिने मला या तिच्या अत्यंत जवळच्या प्रोजेक्टबद्दल सांगितलं आणि त्यावर तिने मला कृष्णाचा आवाज करू शकाल का? हे विचारल्यावर मी तिला हो म्हणालो आणि मी या कारणासाठी हो म्हणालो कारण तिची काम करण्याची जिद्द बघून मला हे खूप जाणवलं की एवढे कष्ट घेऊन ती अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीचा विचार करून काम करते. आणि ज्याची सुरुवात कृष्णापासून होते ते सगळचं छान होतं. संभवामी युगे युगेचा एक भाग असल्याचा मला खूप अभिमान आहे. कृष्ण हा एक सखा आहे तो एखाद्या व्यक्तीला वाट दाखवणारा आपला मित्र आहे आणि म्हणून संस्कृती जे काम करतेय ते उत्तम करेन यात शंका नाही आणि तिला या प्रोजेक्ट साठी खूप खूप शुभेच्छा!

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande