शक्तीमान रिटर्न्स : भारताचा मूळ सुपरहिरो अखेर पॉकेट एफएमवर परतला !
मुंबई, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। भारताचा सर्वात लोकप्रिय सुपरहिरो ‘शक्तिमान’ पुन्हा एकदा नव्या रुपात परतला आहे. पॉकेट एफएम या ऑडिओ सिरीज प्लॅटफॉर्मने ‘शक्तिमान रिटर्न्स’ या ४० भागांच्या विशेष ऑडिओ मालिकेद्वारे या दंतकथेचं पुनरागमन घडवलं आहे. मूळ शक्ति
Pocket FM Shaktimaan Returns


Pocket FM Shaktimaan Returns


मुंबई, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। भारताचा सर्वात लोकप्रिय सुपरहिरो ‘शक्तिमान’ पुन्हा एकदा नव्या रुपात परतला आहे. पॉकेट एफएम या ऑडिओ सिरीज प्लॅटफॉर्मने ‘शक्तिमान रिटर्न्स’ या ४० भागांच्या विशेष ऑडिओ मालिकेद्वारे या दंतकथेचं पुनरागमन घडवलं आहे. मूळ शक्तिमान अर्थात मुकेश खन्ना यांच्या सहभागासह साकारलेली ही मालिका आता सर्व वापरकर्त्यांसाठी मोफत ऐकता येणार आहे. ९०च्या दशकातील बालपणातील आठवणी जागवणारी ही मालिका आधुनिक धाटणीतील पर्यावरणकथा मांडते, ज्यामध्ये शक्तिमान पुन्हा एकदा मानवतेच्या अस्तित्वासाठी लढताना दिसतो.

या वेळी शक्तिमानची लढाई केवळ वाईट शक्तींविरुद्ध नसून, मानवाच्या स्वतःच्या लोभाविरुद्ध आहे. ‘शक्तिमान रिटर्न्स’मध्ये तो ‘महातत्व’ नावाच्या भ्रष्ट शक्तीशी सामना करतो, जी पृथ्वीचा समतोल पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी विनाशाचा मार्ग अवलंबते. शक्तिमानला पृथ्वीच्या पाच तत्वांचे प्रतीक असलेल्या ‘मणिंचा’ शोध घ्यावा लागतो, आणि या प्रवासात तो जाणतो की खरी शक्ती विनाशात नव्हे, तर करुणा आणि दयेमध्ये आहे.

सिनेमॅटिक ध्वनी आणि प्रभावी कथनशैलीमुळे जवळपास १० तासांची ही ऑडिओ सिरीज श्रोत्यांना एक आगळा वेगळा अनुभव देते. गंगाधर शास्त्री, गीता विश्वास, महात्मा आणि टीआरपी बाबा यांसारखी परिचित पात्रे या कथेला जुनी ओळख आणि नवी गती देतात. पॉकेट एफएमचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन नायक म्हणाले, “आपल्या सर्वांसाठी शक्तिमान हा पहिला खरा हिरो होता. त्याला परत आणण्याचा उद्देश केवळ नॉस्टॅल्जिया नव्हता, तर भारतीय मूल्यांवर आधारित हिरो आधुनिक कथनशैलीत कसा जिवंत राहू शकतो, हे दाखवणे हा हेतू होता. जगाने अमेरिकन सुपरहिरोंकडे पाहिले आहे, पण भारताकडेही स्वतःच्या कथा, संस्कार आणि नायक आहेत. पॉकेट एफएमवर शक्तिमान परत येणं म्हणजे त्या वारशाला नवा जीव देणं आहे.”

स्वतः शक्तिमानची भूमिका साकारणारे मुकेश खन्ना यांनीही या पुनरागमनाबद्दल भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “शक्तिमानची निर्मिती सत्य, नि:स्वार्थता आणि धैर्याची प्रेरणा देण्यासाठी झाली होती. हे मूल्ये आजही तितकीच जिवंत आहेत. पॉकेट एफएमने या मालिकेला नवं कथानक दिलं असलं तरी शक्तिमानचा आत्मा अबाधित ठेवला आहे. त्यांच्या कल्पकतेला आणि मेहनतीला माझा सलाम.”

या मालिकेच्या प्रक्षेपणानिमित्त पॉकेट एफएमने ‘डिस्ट्रेस्ड व्हिलन्स’ नावाचा एक मजेशीर जाहिरातीचा व्हिडिओही प्रदर्शित केला आहे. यात ९०च्या दशकातील प्रसिद्ध खलनायक गुलशन ग्रोव्हर, रणजीत, शहझाद खान, शहबाज खान आणि सुरेंद्र पाल पुन्हा एकत्र आले आहेत. “अंधेरा कायम रहेगा”पासून ते “बॅड मॅन”पर्यंतच्या प्रसिद्ध संवादांनी भरलेला हा व्हिडिओ नॉस्टॅल्जियाने भारलेला आहे. शक्तिमानच्या पुनरागमनाने हादरलेल्या या खलनायकांच्या प्रतिक्रिया पाहणे म्हणजे ९०च्या दशकाचा आनंद पुन्हा अनुभवण्यासारखे आहे.

पॉकेट एफएमचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि ब्रँड मार्केटिंग प्रमुख विनीत सिंग यांनी सांगितले, “शक्तिमानच्या पुनरागमनाचा आनंद साजरा करताना आम्ही लोकांना जुन्या आठवणींशी जोडू इच्छित होतो. त्या काळातील खलनायकांना पुन्हा एकत्र आणणं म्हणजे भारतीय पॉप संस्कृतीचं पुनर्मिलनच आहे. आमचा हेतू होता लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणे आणि त्यांना पुन्हा ‘सॉरी शक्तिमान!’ म्हणण्याची वेळ आणतो.”

‘शक्तिमान रिटर्न्स’द्वारे पॉकेट एफएमने केवळ एका सुपरहिरोचा पुनर्जन्मच केला नाही, तर भारतीय कथा सांगण्याच्या परंपरेला आधुनिक ध्वनीतून नवा आयाम दिला आहे. ही मालिका भारतीय सुपरहिरोच्या आत्म्याला नवा आकार देते आणि पुन्हा एकदा सिद्ध करते की प्रकाशाची शक्ती आजही तितकीच तेजस्वी आहे.

https://apps.apple.com/in/app/pocket-fm-audio-series/id1538433480

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande