मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक बिनविरोध
मुंबई, 10 नोव्हेंबर (हिं.स.)मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेल्या सर्वांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अजिंक्य नाईक यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. अजिंक्य नाईक पुन्हा एकदा एमस
अजिंक्य नाईक


मुंबई, 10 नोव्हेंबर (हिं.स.)मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेल्या सर्वांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अजिंक्य नाईक यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. अजिंक्य नाईक पुन्हा एकदा एमसीएचे अध्यक्ष बनले आहेत. अध्यक्षपदासाठी जितेंद्र आव्हाड, प्रसाद लाड, मिलिंद नार्वेकर, डायना एडलजी आणि विहंग सरनाईक यांनी अर्ज भरला होता. पण या सर्वांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अजिंक्य नाईक बिनविरोध अध्यक्ष झाले आहेत. आता मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव आणि खजिनदार या पदांसाठी निवडणूक होणार आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी असताना अमोल काळे यांचे निधन झाल्याने अजिंक्य नाईक अध्यक्ष झाले होते. अजिंक्य नाईक यांची आता पुन्हा एकदा बिनविरोध अध्यक्षपदी निवड झाली आहे. अजिंक्य नाईक 23 जुलै 2024 रोजी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सर्वात तरुण अध्यक्ष बनले होते. नाईक यांनी वयाच्या 38 व्या वर्षी अध्यक्ष होण्याचा मान मिळवला होता.

अध्यक्षपदासाठीची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. त्यामुळे आता इतर पदांसाठी निवडणूक होणार आहे. ही निवडणूक 12 नोव्हेंबरला होणार आहे. उपाध्यक्षपदासाठी 9, सचिवपदासाठी 10, सहसचिवपदासाठी नऊ आणि खजिनदार पदासाठी 8 अर्ज आले आहेत. त्याचबरोबर कार्यकारीणी पदासाठी 48 अर्ज आले आहेत. आता इतर पदांवर कुणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande