जपान ओपनमध्ये लक्ष्य सेन आणि प्रणॉयच्या कामगिरीकडे लक्ष
टोकियो, १० नोव्हेंबर (हिं.स.). भारतीय बॅडमिंटन खेळाडू एच.एस. प्रणॉय आणि लक्ष्य सेनकडून कुमामोतो मास्टर्स जपान सुपर ५०० स्पर्धेत चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. गेल्या काही स्पर्धांमधील निराशाजनक कामगिरीनंतर लक्ष्य सेनने पुनरागमन केले आहे. हा
लक्ष्य सेन


टोकियो, १० नोव्हेंबर (हिं.स.). भारतीय बॅडमिंटन खेळाडू एच.एस. प्रणॉय आणि लक्ष्य सेनकडून कुमामोतो मास्टर्स जपान सुपर ५०० स्पर्धेत चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. गेल्या काही स्पर्धांमधील निराशाजनक कामगिरीनंतर लक्ष्य सेनने पुनरागमन केले आहे. हाँगकाँग ओपनमध्ये उपविजेतेपद पटकावून आणि नंतर डेन्मार्क आणि हायलो ओपनमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठून त्याने आपला आत्मविश्वास मिळवला. आता पॅरिस ऑलिंपिकमध्ये चौथे स्थान मिळवणारा २४ वर्षीय बॅडमिंटनपटू ही लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. सातव्या मानांकित लक्ष्य सेनचा पहिला सामना जागतिक क्रमवारीत २५ व्या क्रमांकावर असलेल्या जपानच्या कोकी वतानाबेविरुद्ध असणार आहे.

२०२३ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारा प्रणॉय गेल्या काही काळापासून तंदुरुस्तीच्या समस्यांशी झुंजत आहे. पॅरिस ऑलिंपिकपूर्वी चिकुनगुनियामुळे त्याच्या तयारीवर परिणाम झाला होता. आणि तो वेदना असूनही ऑलिंपिकमध्ये खेळला होता. पण पहिल्या फेरीतच तो बाहेर पडला. गेल्या वर्षी मलेशिया मास्टर्स जिंकणारा आणि ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये उपविजेता राहिलेला प्रणॉय आता दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करत आहे. पहिल्या फेरीत त्याचा सामना मलेशियाच्या जुन हाओ लिओंगशी होणार आहे.प्रणॉयला बरगडीच्या दुखापतीमुळे कोरिया ओपनमध्ये इंडोनेशियाच्या चिको ऑरा द्वी वार्डोयोविरुद्धचा पहिला फेरीचा सामना सोडावा लागला होता. जवळजवळ एक महिन्याच्या विश्रांतीनंतर तो आता बॅडमिंटन कोर्टवर परतण्यास सज्ज आहे.

या स्पर्धेत सर्वांच्या नजरा युवा आयुष सेठीवर असतील. अमेरिकन ओपन जिंकले आणि हायलो ओपनमध्ये माजी विश्वविजेता लो किआन यूचा पराभव केला होता. आयुषचा पहिला सामना अव्वल मानांकित थायलंडच्या कुनलावुत विटिडसार्नविरुद्ध असेल. मकाऊ ओपन सुपर ३०० मध्ये उपांत्य फेरी गाठणाऱ्या थरुन मन्नेपल्लीचा सामना कोरियाच्या जिओन ह्योक जिनशी होणार आहे.

मिश्र दुहेरीत, भारतीय जोडी रोहन कपूर आणि रुत्विका शिवानी गड्डे अमेरिकन जोडी प्रेस्ली स्मिथ आणि जेनी गाईशी लढतील. इतर श्रेणींमध्ये कोणताही भारतीय बॅडमिंटनपटू सहभागी होणार नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande