
अमरावती, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। बारामती स्पोर्ट फौउंडेशनच्या वतीने आयोजित मॅरॅथॉन स्पर्धेत ४२ कि.मी गटात धामणगाव तहसील मधील सध्या भातकुली येथे कार्यरत असलेले ग्राम महसूल अधिकारी दिनेश ठाकरे यांनी ४२ कि.मी.अंतर ४ तास ३४ मी.पूर्ण करून १४ जून २०२६ रोजी दक्षिण आफ्रिका येथे होणाऱ्या कॉम्रेड मॅरॅथॉन स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे.
नुकतेच बारामती फाउंडेशनच्या वतीने आयोजीत केलेल्या ५ किलोमीटर १० किलोमीटर ,२१ किलोमीटर व ४२ किलोमीटर गटात मॅरॅथॉन आयोजित केली होती.राज्यातील ४२ किलोमीटर गटात ४५० धावपटू सहभागी झाले होते.यात अमरावतीचे २१किलोमीटर गटात व ४२ किलोमीटर गटात ६० धावपटू सहभागी झाले होते .त्यामध्ये धामणगाव तहसील मधील ग्राममहसूल अधिकारी दिनेश ठाकरे यांनी ४२ कि.मी ची स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली व कॉम्रेड मॅरॅथॉन साठी पात्र ठरले.
त्याचप्रमाणे अमरावती रोड रनर्स ग्रुपचे सदस्य राजेश कोचे यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला.अमरावती मधील ६० स्पर्धाकापैकी २६रनर्स १४ जून २०२६ रोजी दक्षिण आफ्रिका येथे होणाऱ्या कॉम्रेड मरेथोन साठी पात्र ठरले आहे.याचे श्रेय अमरावती रोड रनर्स ग्रुपचे कोच दिलीप पाटील यांना दिले जात आहे.या स्पर्धेत सर्वाधिक रनर्स सहभागी होण्यासाठी अमरावती रोड रनर्स ग्रुपला तथा अमरावती मॅरॅथॉन असोसिएशन चे संचालक दिलीप पाटील यांना बारामती स्पोर्ट्स फाउंडेशन च्या वतीने ट्रॉफी देऊन सन्मानित केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी