दिल्लीतील स्फोटानंतर देशभरात हाय अलर्ट
- मुंबई, यूपी, बिहार, उत्तराखंडमध्ये सुरक्षा कडक नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर (हिं.स.) : राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ आज, सोमवारी संध्याकाळी झालेल्या भीषण स्फोटानंतर देशभरात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या स्फोटात आतापर्यंत 8 जणांचा
दिल्लीतील भीषण  स्फोटानंतरचे दृष्य


- मुंबई, यूपी, बिहार, उत्तराखंडमध्ये सुरक्षा कडक

नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर (हिं.स.) : राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ आज, सोमवारी संध्याकाळी झालेल्या भीषण स्फोटानंतर देशभरात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या स्फोटात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पोलिस आणि बचाव पथके घटनास्थळी कार्यरत आहेत.

दिल्ली पोलिसांनी शहरभरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली असून संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. दिल्ली अग्निशमन सेवेच्या सात गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून बचावकार्य सुरू आहे.स्फोटानंतर देशातील इतर महत्त्वाच्या शहरांमध्येही सतर्कता वाढविण्यात आली आहे. मुंबई, लखनौ, पटना, बेंगळुरू, आणि देहरादून येथे पोलिस व सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस, विमानतळ आणि मॉल्ससारख्या संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड (BDS) च्या पथकांना गर्दीच्या ठिकाणी तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पोलिस गस्त वाढविण्यात आली आहे. एडीजी (कायदा व सुव्यवस्था) अमिताभ यश यांनी सर्व वरिष्ठ अधिकार्यांना धार्मिक स्थळे, सीमावर्ती भाग आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. बिहारमध्ये, मंगळवारी होणाऱ्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. संवेदनशील भागांमध्ये पोलिस आणि केंद्रीय दलांची तैनाती वाढविण्यात आली आहे. भारत-नेपाळ सीमेवरही कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सशस्त्र सीमा बल (एसएसबी) आणि स्थानिक पोलिसांकडून प्रत्येक ये-जा करणाऱ्यावर काटेकोर नजर ठेवली जात आहे.उत्तराखंडमध्ये सर्व पर्यटनस्थळे, बाजारपेठा आणि वाहतूक केंद्रांवर पोलिस गस्त वाढविण्यात आली आहे. राज्यात हाय अलर्ट लागू आहे.दरम्यान, गृहमंत्रालयाने स्फोटाच्या चौकशीसाठी विशेष पथक नेमले असून घटनेमागील कारणांचा शोध घेतला जात आहे. प्राथमिक तपासात स्फोटाचे स्वरूप स्पष्ट झालेले नाही.----------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande