
नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर (हिं.स.) : राजधानी दिल्ली येथे सोमवारी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमाराला एका आय-20 मॉडेलच्या कारमध्ये भीषण स्फोट होऊन 13 जण मृत्यूमुखी पडलेत. तर सुमारे 30 जण जखमी झाले आहेत. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच स्फोटातील जीवितहानीबद्दल त्यांनी सहवेदना व्यक्त केल्या आहेत.
यासंदर्भात ट्विटरवर जारी केलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले की, दिल्लीतील स्फोटात ज्यांनी आपले आप्तेष्ट गमावले आहेत त्यांच्याप्रति सहवेदना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो. बाधित व्यक्तींना अधिकाऱ्यांकडून मदत केली जात आहे. गृहमंत्री अमित शाह जी आणि इतर अधिकाऱ्यांसोबत परिस्थितीचा आढावा घेतला, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केलेय.
------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी