
पणजी, 10 नोव्हेंबर (हिं.स.)भारतीय ग्रँडमास्टर विदित गुजराती टाय-ब्रेक गेमच्या दुसऱ्या सेटमध्ये अमेरिकेच्या सॅम शँकलँडकडून २.५-३.५ असा पराभव पत्करून बुद्धिबळ विश्वचषकातून बाहेर पडला.आणखी एक भारतीय खेळाडू एस.एल. नारायणन यालाही टाय-ब्रेक गेमच्या पहिल्या सेटमध्ये चीनच्या यांगी यूकडून पराभव स्वीकारावा लागला.
व्ही. कार्तिकने रोमानियाच्या डीक बोगदान-डॅनियलला १.५-०.५ असा पराभव सहन करत चौथ्या फेरीत प्रवेश केला. कार्तिक आता प्री-क्वार्टरफायनलपासून फक्त एक विजय दूर आहे.
विदित गुजराती हा स्पर्धेच्या पहिल्या तीन फेरीत बाहेर पडणारा तिसरा प्रमुख भारतीय बुद्धिबळपटू आहे. त्याच्या आधी विश्वविजेता डी. गुकेश आणि अरविंद चिथंबरम होते. गुकेशचा जर्मनीच्या फ्रेडरिक स्वानने पराभव केला, तर चिथंबरमचा दुसऱ्या फेरीत कार्तिकने पराभव केला.
चार भारतीय बुद्धिबळपटू चौथ्या फेरीत पोहोचले आहेत. यामध्ये अर्जुन एरिगाईसी, आर. प्रज्ञानंद, पी. हरिकृष्ण आणि जागतिक ज्युनियर चॅम्पियन व्ही. प्रणव यांचा समावेश आहे. या स्पर्धेतील अव्वल तीन बुद्धिबळपटूंना पुढील वर्षी होणाऱ्या FIDE कॅँडीडेट्स स्पर्धेचे तिकीट मिळेल. पण या स्पर्धेची तारीख आणि ठिकाण जाहीर केलेले नाही.
जागतिक विजेता डी. गुकेश गोव्यात सुरू असलेल्या FIDE बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेतून याआधीच बाहेर पडला आहे. गेल्या वर्षी जागतिक अजिंक्यपद जिंकल्यानंतर तो पहिल्यांदाच आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर खेळत होता. १९ वर्षीय गुकेशचा जर्मन ग्रँड मास्टर फ्रेडरिक स्वानने ०.५-१.५ असा पराभव केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे