
मुंबई, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। वनप्लस कंपनी भारतातील ग्राहकांसाठी आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन ‘वनप्लस 15’ लॉंच करण्याच्या तयारीत आहे. 13 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 7 वाजता या फोनचं अधिकृत अनावरण होणार आहे. हा स्मार्टफोन क्वालकॉमच्या नव्या स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 प्रोसेसरसह भारतातील पहिला डिव्हाइस ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या फोनचा बेस व्हेरिएंट 72,999 रुपये आणि हायर व्हेरिएंट 76,999 रुपयांमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. किंमत मागील वनप्लस 13 पेक्षा थोडी जास्त असली तरी, आकर्षक प्रोमोशनल ऑफर्समुळे खरेदीदारांसाठी हा व्यवहार फायद्याचा ठरेल.
वनप्लस 15 मध्ये 6.78 इंचाचा BOE X3 8T LTPO फ्लॅट डिस्प्ले असून, 1.5K रिझोल्यूशन आणि 165Hz रिफ्रेश रेटमुळे गेमिंग व व्हिडिओ स्ट्रीमिंगचा अनुभव अधिक स्मूथ होईल. 1800 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस असल्याने सूर्यप्रकाशातही स्क्रीन स्पष्ट दिसेल. फोनमध्ये 7300 mAh क्षमतेची बॅटरी असून, 120W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट आहे. एका चार्जवर पूर्ण दिवस चालणारी ही बॅटरी जलद चार्जिंगमुळे वापरकर्त्यांचा वेळ वाचवेल. कॅमेराच्या बाबतीत हा फोन अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. यात ट्रिपल 50 मेगापिक्सलचा रिअर सेटअप आहे ज्यात OISसह मुख्य लेन्स, अल्ट्रावाइड आणि पेरिस्कोप लेन्सचा समावेश आहे. फ्रंट कॅमेरा 32 मेगापिक्सलचा असून 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. रिअर कॅमेराद्वारे 8K व्हिडिओ शूटिंग शक्य असून, AI-आधारित इमेज प्रोसेसिंगमुळे नाइट शॉट्स आणि झूम फोटोग्राफी उत्कृष्ट दर्जाची होईल. वनप्लस 15 मध्ये ColorOS 16 आधारित अँड्रॉइड सिस्टीम असेल. यामध्ये Wi-Fi 7, ब्लूटूथ 5.4, NFC, ड्युअल स्टिरिओ स्पीकर्स आणि इन-डिस्प्ले अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेंसर असे आधुनिक फीचर्स आहेत. तसेच IP66, IP68, IP69 आणि IP69K रेटिंगमुळे फोन धूळ आणि पाण्यापासून पूर्णपणे सुरक्षित राहील. भारतामध्ये हा फोन अमेझॉन, वनप्लसच्या अधिकृत वेबसाइट आणि पार्टनर स्टोअर्सवर उपलब्ध होईल. लॉंच दिवशी रात्री 8 वाजल्यापासून ओपन सेल सुरू होईल. कंपनीकडून या कार्यक्रमाचं लाइव्ह स्ट्रीमिंगही करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, पहिल्या विक्रीदरम्यान खरेदीदारांना मोफत वनप्लस नॉर्ड इअरबड्स (किंमत 2,699) रुपये भेट म्हणून मिळण्याची शक्यता आहे. वनप्लस 15 च्या दमदार स्पेसिफिकेशन्स, प्रीमियम डिझाइन आणि जबरदस्त पर्फॉर्मन्समुळे हा फोन गेमर्स, फोटोग्राफी प्रेमी आणि टेक उत्साहींसाठी 2025 मधील सर्वोत्तम पर्याय ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule