यूआयडीएआयकडून नवीन ‘आधार’ अ‍ॅप लाँच
मुंबई, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। भारतीय नागरिकांसाठी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) यांनी नवीन ‘आधार’ अ‍ॅपची घोषणा केली असून हे अ‍ॅप आधार कार्ड अधिक सुरक्षित आणि सुलभपणे वापरण्यास मदत करणार आहे. हे अ‍ॅप गूगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍
UIDAI launches new  MyAadhaar app


मुंबई, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। भारतीय नागरिकांसाठी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) यांनी नवीन ‘आधार’ अ‍ॅपची घोषणा केली असून हे अ‍ॅप आधार कार्ड अधिक सुरक्षित आणि सुलभपणे वापरण्यास मदत करणार आहे. हे अ‍ॅप गूगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर डाउनलोडसाठी उपलब्ध असून, मायआधार अ‍ॅपला पूरक म्हणून कार्य करेल. नव्या अ‍ॅपद्वारे वापरकर्ते आपले आधार कार्ड डिजिटल स्वरूपात जतन, दाखवू आणि सुरक्षितपणे शेअर करू शकतील.

पूर्वी नागरिक पीडीएफ फाइल किंवा डिजिलॉकरच्या माध्यमातून आधार सेव करत होते, मात्र हे नवीन अ‍ॅप सर्व सुविधा एका युनिफाइड प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देते. यूआयडीएआयनं स्पष्ट केलं आहे की हे अ‍ॅप मायआधार अ‍ॅपची जागा घेणार नाही, तर त्यास पूरक ठरेल. मायआधार अ‍ॅपमध्ये डिजिटल कार्ड डाउनलोड, पीव्हीसी कार्ड ऑर्डरिंग, ईमेल आणि मोबाईल व्हेरिफिकेशन तसेच व्हर्च्युअल आयडी जनरेशनसारख्या सुविधा आहेत, तर नव्या अ‍ॅपचं लक्ष मुख्यतः आधार कार्ड जतन करणे, दाखवणे आणि सुरक्षितपणे शेअर करणे यावर केंद्रित आहे.

या अ‍ॅपमध्ये वापरकर्त्यांना एका मोबाईल नंबरशी जोडलेले पाचपर्यंत आधार प्रोफाइल्स सेव करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड एका ठिकाणी उपलब्ध राहतील. याशिवाय, प्रोफाइल पेजवर आधार कार्ड मास्क करण्याची सुविधा देण्यात आली आहे, ज्यामुळे गोपनीयता कायम राखली जाते. आधार शेअर करताना व्हेरिफायबल क्रेडेंशियल फॉरमॅट वापरला जातो, जो दुसऱ्या पक्षाला आधाराची ओळख अधिक विश्वसनीयरीत्या सत्यापित करण्यास मदत करतो. तसेच, क्यूआर कोड स्कॅन करून आधारच्या मदतीने विविध सेवा आणि व्यवहार करणेही शक्य होणार आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने हे अ‍ॅप अत्याधुनिक असून त्यात बायोमेट्रिक लॉकची सुविधा दिली आहे. हे लॉक सक्रिय केल्यावर फेस ऑथेंटिकेशन किंवा फिंगरप्रिंटद्वारेच अ‍ॅप तात्पुरते अनलॉक करता येते. तसेच, आधार अपडेट झाल्यानंतर नव्या माहितीचं त्वरित प्रतिबिंब या अ‍ॅपमध्ये दिसेल, ज्यामुळे नाव, पत्ता किंवा इतर तपशील बदलल्यानंतरचा गोंधळ टाळला जाईल.

यूआयडीएआयनं सांगितलं की हे अ‍ॅप ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेशी सुसंगत आहे आणि नागरिकांना कागदविरहित, सोयीस्कर डिजिटल ओळख प्रणालीकडे नेणारं महत्त्वाचं पाऊल आहे. बँकिंग, सरकारी योजना किंवा खासगी व्यवहारांसाठी आता आधार शेअरिंग केवळ एका टॅपवर शक्य होणार असून, डिजिटल सुरक्षेच्या नव्या युगाची सुरुवात या अ‍ॅपद्वारे होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande