औसा नगर परिषद : काँग्रेसकडून पक्ष निरीक्षक म्हणून ॲड.समद पटेल यांची नियुक्ती
लातूर, 13 नोव्हेंबर (हिं.स काँग्रेस पक्षाकडून आगामी लातूर जिल्ह्यातील औसा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीकरिता काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ,राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख,राज्याचे माजी मंत्री आ.अमित विलासराव देशमुख,खा.डॉ.शिव
सार्वत्रिक निवडणुकीकरिता


लातूर, 13 नोव्हेंबर (हिं.स

काँग्रेस पक्षाकडून आगामी लातूर जिल्ह्यातील औसा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीकरिता काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ,राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख,राज्याचे माजी मंत्री आ.अमित विलासराव देशमुख,खा.डॉ.शिवाजी काळगे,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धीरज विलासराव देशमुख तसेच प्रदेश उपाध्यक्ष तथा लातूर जिल्ह्याचे प्रभारी बाळासाहेब देशमुख यांच्या सूचनेनुसार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी आपल्या अनुभवी नेत्यांवर संघटनात्मक जबाबदारी सोपवली आहे.

लातूर जिल्ह्यातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व,विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष आणि लातूरचे माजी उपनगराध्यक्ष (माजी स्थायी समिती सभापती) ॲड.समद पटेल यांची या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ॲड.समद पटेल हे काँग्रेस पक्षातील एक निष्ठावान आणि अनुभवी चेहरा आहेत.लातूर शहर महानगरपालिकेतील त्यांचा प्रशासकीय अनुभव (माजी उपमहापौर),तसेच विलास को-ऑपरेटिव्ह बँकेसारख्या मोठ्या संस्थेतील उपाध्यक्षपदामुळे सहकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामाची त्यांना सखोल माहिती आहे.त्यांच्या या अनुभवाचा फायदा औसा नगर परिषद निवडणुकीत पक्षाला होईल आणि औसा नगरपरिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल या उद्देशाने पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

ॲड. समद पटेल यांच्यावर सोपवलेल्या प्रमुख जबाबदाऱ्या

पक्ष निरीक्षक म्हणून ॲड. समद पटेल हे औसा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाच्या कार्याचे नेतृत्व करतील.

त्यांच्या प्रमुख जबाबदाऱ्यांमध्ये पुढील बाबींचा समावेश आहे:

उमेदवार निवड आणि प्रचार:- औसा नगर परिषदेसाठी सक्षम आणि विजयी उमेदवारांची निवड प्रक्रिया पूर्ण करणे,तसेच पक्षाच्या प्रभावी प्रचार यंत्रणेची आखणी आणि अंमलबजावणी करणे.

रणनीती आणि समन्वय:- स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी आणि इच्छूक उमेदवारांमध्ये समन्वय साधून निवडणुकीसाठी प्रभावी रणनीती (S्तयार करणे.

मतदारांशी संवाद:- पक्षाची ध्येयधोरणे मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे.

पक्षश्रेष्ठींना अहवाल:- निवडणुकीच्या तयारीचा आणि स्थानिक राजकीय परिस्थितीचा नियमित अहवाल पक्षश्रेष्ठींना सादर करणे.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande