
बीड, 13 नोव्हेंबर (हिं.स.)।
बीड जिल्ह्यातील पिंपरी घाटा येथील वीर जवान अविनाश आदिनाथ वायभासे यांच्या निधनाचे वृत्त हाती आली आहे. पिंपरी (घाटा), ता.आष्टी या गावचे सुपुत्र, अविनाश यांनी भारतीय सैन्य दलात 16 वर्षे अविरत सेवा बजावली. देशसेवा करत असतानाच अचानक प्रकृती बिघडल्याने ते कर्तव्यावर असताना शहीद झाले. आमदार सुरेश धस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
अविनाश यांनी कर्तव्य, शिस्त आणि राष्ट्रनिष्ठा या मूल्यांना जीवनभर प्रथम स्थान दिले. देशरक्षणाची जबाबदारी पार पाडताना त्यांनी दाखवलेले समर्पण आणि त्याग प्रेरणादायी आहे. त्यांच्या जाण्याने पिंपरी (घाटा) गावाने, बीड जिल्ह्याने आपला वीर सुपुत्र गमावला आहे.
भाजप आमदार सुरेश धस यांनी म्हटले आहे की, शहीद जवान अविनाश वायभासे यांना मानाचा सॅल्युट देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मनापासून सहभागी आहे. राष्ट्रासाठी आयुष्य अर्पण करणारा असा वीर कधीही विसरला जाणार नाही. त्यांची देशसेवेची भावना, त्यांचा त्याग आणि त्यांची ओळख सदैव आपल्या स्मरणात जिवंत राहील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis