
बीड, 13 नोव्हेंबर (हिं.स.)।
एसटी महामंडळाच्या एसी इलेक्ट्रिक बस ढेकणमोहा, घाटसावळी व जरुड या महत्वपूर्ण ठिकाणी थांबत नाहीत शिवाय बीड ते वडवणी स्थानिक बस सेवा सुरू करणे आवश्यक आहे. यावर अशा मागण्यासाठी प्रवाशी शिष्टमंडळाने एसटी बसच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. तसेच बीड ते आंबेसावळी मण्यारवाडी केसापुरी मुक्कामी गाडी बंद झालेली असून ती सुरू करण्यात यावी या व इतर मागण्यांसाठी महामंडळ अधिकाऱ्यांची भेट घेतली.
बीड ते वडवणी ही बस सेवा सकाळी ८ वाजता वडवणी येथून निघणे आवश्यक असून सायंकाळी बीड येथून ६ वाजता परत वडवणी दिशेने असावी. या बस सेवेची गरज ही विद्यार्थी, बीड येथे कार्यरत असलेले विविध शासकीय व गैरशासकीय अस्थापनातील कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक यांना आवश्यक आहे.
या मार्गावर पांगर बावडी, मोची पिंपळगाव फाटा, राजुरी (वांगी) फाटा, शिवणी फाटा, जरुड फाटा, बाभळखुंटा फाटा, मौजवाडी फाटा, मौज, ब्रम्हगाव, ढेकणमोहा, श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी फाटा, बकरवाडी, घाटसावळी, पोखरी फाटा, मैंदा आदी ठिकाणे असून या बससेवेचा फायदा हा उपरोक्त गावांसह इतरही गावांना होणार आहे.
ज्यामध्ये काळेगाव, आंबेसावळी, कुटेवाडी, भवानवाडी, नाळवंडी, जुजगव्हाण, मानकुरवाडी, निर्मळवाडी, कऱ्हाळवाडी, ढेकणमोहा तांडा, वलीपूर, घाटजवळा, घाटसावळी तांडा येथील प्रवाशांना होईल. उपरोक्त मागणीचा सकारात्मक विचार करावा ही राज्य परिवहन महामंडळाकडे विनंती केली.. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, युवक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis