अमरावतीत इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरचे फलक लागल्याने वाद, डॉ. अनिल बोंडे आक्रमक
अमरावती, 13 नोव्हेंबर (हिं.स.) “I Love Mohammad” मोहिमेनंतर आता अमरावती शहरात IIC (Islamic Information Center Maharashtra) या नावाने फलक लावण्यात आले असून, त्यावर “विचारा इस्लामविषयी?” असा मजकूर देण्यात आला आहे. या फलकांवर मोठ्या अक्षरात टोल-फ्री
अमरावतीत इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरचे फलक लागल्याने वाद — खासदार डॉ. अनिल बोंडे आक्रमक


अमरावती, 13 नोव्हेंबर (हिं.स.)

“I Love Mohammad” मोहिमेनंतर आता अमरावती शहरात IIC (Islamic Information Center Maharashtra) या नावाने फलक लावण्यात आले असून, त्यावर “विचारा इस्लामविषयी?” असा मजकूर देण्यात आला आहे. या फलकांवर मोठ्या अक्षरात टोल-फ्री क्रमांकही दिलेला असून, फलक पंचवटी चौक तसेच शहरातील कॉलेज परिसरात लावण्यात आले आहेत. या फलकांमुळे शहरात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणावर भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

डॉ. बोंडे म्हणाले “अमरावतीतील कॉलेज भागात मोठ्या प्रमाणावर ‘विचारा इस्लाम बद्दल’ असे पोस्टर लावण्यात आले आहेत. या फलकांखाली मोठ्या अक्षरात टोल-फ्री क्रमांक दिला असून, त्यावर ‘IIC’ म्हणजे Islamic Information Center असे लिहिले आहे. मी स्वतः त्या क्रमांकावर फोन केला असता कॉल थेट हैदराबाद येथे लागला. जेव्हा मी विचारणा केली की ही संस्था कोण चालवते, कोणते कार्य करते, याबाबत काहीही स्पष्ट माहिती देण्यात आली नाही.”

ते पुढे म्हणाले या माध्यमातून युवकयुवतींना प्रेरित करून त्यांना आपल्या प्रभावाखाली घेण्याचा, इस्लामकडे आकर्षित करण्याचा आणि त्यातून जिहादी तयार करण्याचा प्रयत्न असल्याची शक्यता आहे. अशा प्रकारचे पोस्टर केरळ आणि काश्मीरमध्येही लावण्यात आले होते. अशा माध्यमातून शहराची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जात आहे.”डॉ. बोंडे यांनी पुढे सांगितले की, “या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याची मी अमरावती पोलिस आयुक्तांकडे मागणी करणार आहे. या फलकांबाबत अद्याप कोणतीही जबाबदारी स्वीकारणारा समोर आलेला नाही.” या घटनेमुळे अमरावतीत राजकीय आणि सामाजिक हालचालींना वेग आला असून, प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande