जालन्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 42 झोपडपट्टी धारकांना मालमत्ता पत्र
अडीच लाख नागरिकांना हक्काचे घर आणि मालकी हक्क प्राप्त होणार जालना, 13 नोव्हेंबर (हिं.स.) शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 42 झोपडपट्टी धारकांना मालमत्ता पत्र देण्याचा सर्वेक्षण कार्यक्रम शुभारंभ करण्यात आला. जालना म
अडीच लाख नागरिकांना हक्काचे घर आणि मालकी हक्क प्राप्त होणार


अडीच लाख नागरिकांना हक्काचे घर आणि मालकी हक्क प्राप्त होणार

जालना, 13 नोव्हेंबर (हिं.स.)

शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 42 झोपडपट्टी धारकांना मालमत्ता पत्र देण्याचा सर्वेक्षण कार्यक्रम शुभारंभ करण्यात आला.

जालना महानगरपालिकेच्या हद्दीतील ४२ झोपडपट्टीधारकांना मालमत्ता पत्रक (पीआर कार्ड) देण्याच्या सर्वेक्षण कार्याचा शुभारंभ शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित बांधव महिला भगिनींशी बोलताना शिंदे म्हणाले की, जालना शहर महानगरपालिका अंतर्गत 42 झोपडपट्टी धारकांच्या पी.आर.कार्ड संदर्भात आमदार अर्जुनराव खोतकर यांनी वारंवार पाठपुरावा करून विधानसभेत वेळोवेळी हा विषय सरकार समोर मांडले व आम्ही यांची मागणी मान्य केली.

झोपडपट्टीधारकांना हक्काची मालकी मिळवून देण्याच्या काम आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरामुळे हे शक्य झाले.

हे सरकार गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, आपल्या माता-भगिनी आणि सर्वसामान्य माणसाचे आहे. जालना शहरातील सर्व विषयांवर आम्ही गांभीर्याने काम करत आहोत. शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे,

या उपक्रमामुळे अडीच लाख नागरिकांना हक्काचे घर आणि मालकी हक्क प्राप्त होणार आहे. हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. हेच सरकार सर्वसामान्यांच्या पाठीशी उभे आहे, आणि भविष्यातही गोरगरीबांसाठी निर्णय घेत राहील असे याप्रसंगी निक्षून सांगितले.

यावेळी घनसावंगी आमदार हिकमतदादा उधान, युवासेना सचिव अभिमन्यू खोतकर, शिवसेना संपर्क पंडितदादा भुतेकर, पदाधिकारी, शिवसैनिक आणि पात्र लाभार्थी झोपडपट्टीधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande