चाकूर : विद्युत पोलवरून खाली कोसळून कर्मचाऱ्याचा मृत्यू
लातूर, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। चाकूर तालुक्यातील चापोली ग्रामपंचायतीचे कर्मचारी सूर्यकांत व्यंकटी भिसे वय ३५ हे गावातील पोलावर चढून बल्ब बसवत असताना अचानक विजेचा तीव्र धक्का बसून तो पोलावरून खाली कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
चाकूर : विद्युत पोलवरून खाली कोसळून कर्मचाऱ्याचा मृत्यू


लातूर, 13 नोव्हेंबर (हिं.स.)।

चाकूर तालुक्यातील चापोली ग्रामपंचायतीचे कर्मचारी सूर्यकांत व्यंकटी भिसे वय ३५ हे गावातील पोलावर चढून बल्ब बसवत असताना अचानक विजेचा तीव्र धक्का बसून तो पोलावरून खाली कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

क्षणभरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण चापोली गावात शोककळा पसरली आहे.

चापोली ग्रामपंचायतमध्ये कर्मचारी म्हणून दोन वर्षांपासून कामावर रुजू झाले होते. गावातील एका पोलवर बल्ब बसविण्यास ते चढले असता अचानक विद्युत पोलवरून खाली कोसळला त्यातच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान त्याचा विवाह येत्या दि १२ डिसेंबर रोजी होणार होता. त्यापूर्वीच त्याच्यावर मृत्यूने घाला घातला. ही घटना चापोली गावात वा-यासारखी पसरताच घटनास्थळी जमा झालेल्या ग्रामस्थांच्या डोळ्यांत अश्रू तर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande