नांदेड : हळदीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याच्या वापरावर प्रक्षेत्र दिनाचे आयोजन
नांदेड, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। जिल्ह्यातील ढोलउमरी येथे हळदीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याच्या वापरावर प्रक्षेत्र दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी डॉ. संतोष चव्हाण, यांनी हळद लागवडीतील एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याचे महत्त्व स्पष्ट केले. त
हळद लागवडीतील एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याचे महत्त्व


नांदेड, 13 नोव्हेंबर (हिं.स.)।

जिल्ह्यातील ढोलउमरी येथे हळदीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याच्या वापरावर प्रक्षेत्र दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी डॉ. संतोष चव्हाण, यांनी हळद लागवडीतील एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की सूक्ष्मअन्नद्रव्यांच्या फवारण्या केल्याने हळदीच्या कंदाची गुणवत्ता सुधारते, उत्पादन वाढते तसेच सूक्ष्मअन्नद्रव्यांच्या कमतरता दूर करण्यास मदत होते.

डॉ. प्रविण चव्हाण, विषय तज्ञ (कृषि विस्तार) यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून हळद लागवडीत येणाऱ्या सध्याच्या अडचणी तसेच दत्तक गावात राबविण्यात येणाऱ्या भविष्यातील विस्तार उपक्रमांबाबत चर्चा केली. स्वच्छता अॅक्शन प्लॅन अंतर्गत त्यांनी शेतकऱ्यांना वर्मी-कंपोस्ट बेडचे वाटप केले. कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांनी प्रात्यक्षिक प्लॉटला भेट देऊन सूक्ष्मअन्नद्रव्य वापराचे प्रत्यक्ष परिणाम पाहिले. या प्रक्षेत्र दिनामध्ये 20 हळद उत्पादक शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande