पश्चिम विदर्भात १० महिन्यांत ८८८ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला
अमरावती, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे सत्र अजूनही सुरूच आहे . यावेळी दिवाळीच्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये तब्बल ८७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे, तर यंदाच्या १० महिन्यांत ८८८ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. १ जान
पश्चिम विदर्भात १० महिन्यांत ८८८ शेतकऱ्यांनी ओढला मृत्यूचा फास  दिवाळीत ८७ शेतकऱ्यांनी कवटाळला मृत्यू


अमरावती, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे सत्र अजूनही सुरूच आहे . यावेळी दिवाळीच्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये तब्बल ८७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे, तर यंदाच्या १० महिन्यांत ८८८ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. १ जानेवारी २००१ पासून आतापर्यंत २२,०३८ शेतकरी आत्महत्या झाल्याचे वास्तव आहे. पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यात जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद केल्या जाते. तेव्हापासून ऑक्टोबर २०२५ या कालावधीत २२,०३८ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास ओढला आहे. यामध्ये शासन मदतीसाठी ११,२९५ प्रकरणे पात्र ठरली तर त्यापेक्षा अधिक ११,३६६ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे वर्षभरापासून ३७७ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याची विभागीय आयुक्तालयाची आकडेवारी आहे. हे सर्व शेतकरी केवळ अस्मानी सुल्तानी संकटाचे नव्हे, तर शासन, प्रशासनाच्या अनास्थेचे बळी असल्याचा आरोप होत आहे. नैसर्गिक आपत्ती, नापिकी, दुष्काळ, बँकांसह खासगी सावकारांचे कर्ज, मुलींचे लग्न, आजारपण आदींसह अन्य कारणांमुळे पश्चिम विदर्भात राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत आहेत. यामध्ये यवतमाळ, अमरावती व बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रकार वाढल्याचे वास्तव आहे. ---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande