
छत्रपती संभाजीनगर, 13 नोव्हेंबर (हिं.स.)।शिवसेना शिंदे पक्षाच्यावतीने कन्नड नगरपरिषदेसाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. शिवसेना आमदार संजना जाधव यांनी यांनी नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांची संपर्क केला आहे. कन्नड येथील जनसंपर्क कार्यालयात होऊ घातलेल्या नगरपालिका तसेच नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
या मुलाखतींच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची कामगिरी, जनसंपर्क, आणि पक्षनिष्ठेचा आढावा घेण्यात आला.
शिवसेनेचे बळ अधिक मजबूत करण्यासाठी आणि आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचे विजय सुनिश्चित करण्यासाठी ही प्रक्रिया पार पडली.या प्रसंगी जिल्हाप्रमुख बाबा साहेब जगताप, जिल्हा महिला प्रमुख पुष्पाताई गव्हाणे, तालुका महिला प्रमुख सोनाली ताई घाटबळे, शहर प्रमुख राम काका पवार, तसेच तालुका प्रमुख नारायण शेठ बोडखे उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis