मुंबई मुख्यालय संघाची नागपूर संघावर मात‎:महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतील पहिला सामना झाला रोमहर्षक
अमरावती, 13 नोव्हेंबर (हिं.स.) येथील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडा संकुलात सुरू असलेल्या महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रदर्शनी क्रिकेट सामन्यात बुधवारी, १२ नोव्हेंबरला मुंबई मुख्यालय संघाने १२
मुंबई मुख्यालय संघाची नागपूर संघावर मात‎:महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतील पहिला सामना झाला रोमहर्षक


अमरावती, 13 नोव्हेंबर (हिं.स.)

येथील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडा संकुलात सुरू असलेल्या महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रदर्शनी क्रिकेट सामन्यात बुधवारी, १२ नोव्हेंबरला मुंबई मुख्यालय संघाने १२ षटकांमध्ये ९६ धावांचे आव्हान देत नागपूर प्रादेशिक संघाला ९० धावांवर रोखले.

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांच्या उपस्थितीत हा सामना सुरू झाला. मुंबई मुख्यालयाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि १२ षटकांमध्ये ६ बाद ९६ धावा केल्या. यात कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे (१३ धावा), सहायक महाव्यवस्थापक वैभव थोरात (१८ धावा) व उपमहाव्यवस्थापक प्रमोद खुळे (१७ धावा) यांनी धावसंख्येला आकार दिला. कार्यकारी संचालक भुजंग खंदारे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके यांनीही साथ दिली. नागपूर प्रादेशिक संघाने १८ धावा अतिरिक्त दिल्या.

नागपूर प्रादेशिक संघाने सावध पवित्रा घेत फलंदाजी सुरू केली. यात अधीक्षक अभियंता संजय वाकडे (१८ धावा) तर कार्यकारी अभियंता प्रफुल्ल लांडे (१५ धावा) यांनी भागीदारी करीत लक्ष्याकडे वाटचाल सुरू केली. कार्यकारी अभियंता पुरूषोत्तम चव्हाण व उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे यांनी प्रत्येकी ११ धावा केल्या. अमरावती परिमंडलाचे मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी ७ धावांचे योगदान देत संघाला विजयाकडे नेले. त्यांना चंद्रपूरचे मुख्य अभियंता हरिश गजबे व अधीक्षक अभियंता प्रविण दरोली यांनी साथ दिली. मात्र शेवटच्या षटकामध्ये विजयासाठी ११ धावांची गरज होती. मुख्यालय संघाकडून प्रमोद खुळे यांनी अचूक गोलंदाजी केली व इतरांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले. त्यामुळे नागपूर प्रादेशिक संघ शेवटच्या षटकात केवळ पाच धावा करू शकला आणि मुख्यालय संघाने सहा धावांनी विजय मिळवला.

मुख्यालय संघामध्ये महाव्यवस्थापक राजेंद्र पांडे, कार्यकारी अभियंता सुनील पावरा व माणिक गवळी, वरिष्ठ व्यवस्थापक बजरंग सुर्यवंशी, उपविधी अधिकारी सुमेध कोलते तर नागपूर प्रादेशिक संघात मुख्य अभियंता सुहास रंगारी (गोंदिया), दिलीप दोडके (नागपूर) व राजेश नाईक (अकोला) यांच्यासह सहायक महाव्यवस्थापक रूपेश देशमुख आदींचा समावेश होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande