अमरावती : न.पा., न.पं. निवडणुकीसाठी तिसऱ्या दिवशी उमेदवारीचा एक अर्ज दाखल
अमरावती, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। जिल्ह्यातील १० नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींसाठी उमेदवारी दाखल करण्याचा आज, बुधवार हा तिसरा दिवस होता. या दिवशी एक नामांकन दाखल झाले. चांदूर रेल्वे येथे दाखल झालेले हे नामांकन तेथील नगरसेवक पदासाठीचे आहे. अशाप्रकारे
न.पा., न.पं. निवडणुकीसाठी तिसऱ्या दिवशी उमेदवारीचा एक अर्ज दाखल अर्जांची संख्या 37 वर; काही पक्षांकडून लवकरच उमेदवारांची घोषणा‎


अमरावती, 13 नोव्हेंबर (हिं.स.)।

जिल्ह्यातील १० नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींसाठी उमेदवारी दाखल करण्याचा आज, बुधवार हा तिसरा दिवस होता. या दिवशी एक नामांकन दाखल झाले. चांदूर रेल्वे येथे दाखल झालेले हे नामांकन तेथील नगरसेवक पदासाठीचे आहे. अशाप्रकारे आतापर्यंत एकूण ३७ जणांचे अर्ज दाखल झाले आहेत.

पहिल्या दिवशी सोमवारी आठ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २८ अर्ज प्राप्त झाले तर आज तिसऱ्या दिवशी केवळ १ अर्ज दाखल झाला.

नगरपालिका, नगरपंचायतींचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया गेल्या १० नोव्हेंबरपासून सुरु झाली. पहिल्या दिवशी अचलपुरमध्ये सात आणि चिखलदऱ्यामध्ये एक अशाप्रकारे केवळ ८ जणांनी उमेदवारी दाखल केली आहे. यामध्ये ५ अर्ज नगराध्यक्ष पदासाठीचे असून उर्वरित ३ अर्ज नगरसेवक पदासाठीचे आहेत. त्यानंतर मंगळवारी दुसऱ्या दिवशी अचलपूर येथे पुन्हा नगराध्यक्ष पदासाठी एक आणि नगरसेवक पदांसाठी १४ अर्ज दाखल झाले. त्याचवेळी नांदगाव खंडेश्वर येथे ९, चांदूर रेल्वे व दर्यापुरात प्रत्येकी दोन तर चिखलदरा येथे नगराध्यक्ष पदासाठी एक अर्ज प्राप्त झाला. आजच्या तिसऱ्या दिवशी चांदूर रेल्वे नगरपालिकेच्या नगरसेवक पदासाठी एक अर्ज प्राप्त झाला आहे.निवडणूक यंत्रणेच्या मते सोमवारी प्राप्त झालेल्या अर्जांमध्ये अचलपुर नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी ४ आणि नगरसेवक पदासाठी ३ अर्ज प्राप्त झाले. तर चिखलदरा नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष पदासाठीचा केवळ एकच अर्ज प्राप्त झाला होता.

भातकुली आणि तिवसा या दोन नगपंचायतीमध्ये लोकनियुक्त सत्ता असल्यामुळे तेथे निवडणूक नाही. उर्वरित ठिकाणी आगामी १७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. हे अर्ज ऑनलाईन दाखल करावयाचे असून त्याची प्रिंट संबंधित निवडणूक अधिकाऱ्याकडे जमा करावयाची आहे. त्याआधारे त्या दिवशी किती अर्ज दाखल झालेत, याची मोजदाद केली जात आहे.

२७८ नगरसेवक, १२ नगराध्यक्षांची निवडणूक जिल्ह्यातील १० नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींसाठी एकूण २७८ नगरसेवक आणि १२ नगराध्यक्षांची निवड करण्यासाठी आगामी २ डिसेंबरला मतदान घेतले जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, ३ डिसेंबरला निकाल घोषित केला जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande