पुणे मॉडेल स्कूल प्रकल्पांतर्गत २५ विद्यार्थी १० दिवसांच्या अमेरिकन दौऱ्यावर
पुणे, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी इस्रोच्या भेटीनंतर आता 10 दिवसांच्या अमेरिका दौर्‍यावर जाणार आहेत. या दौऱ्यासाठी 25 विद्यार्थ्यांची निवड झाली असून, ते वॉशिंग्टन, ऑरलॅंडो आणि सॅन फ्रान्सिस्को या तीन
पुणे मॉडेल स्कूल प्रकल्पांतर्गत २५ विद्यार्थी १० दिवसांच्या अमेरिकन दौऱ्यावर


पुणे, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी इस्रोच्या भेटीनंतर आता 10 दिवसांच्या अमेरिका दौर्‍यावर जाणार आहेत. या दौऱ्यासाठी 25 विद्यार्थ्यांची निवड झाली असून, ते वॉशिंग्टन, ऑरलॅंडो आणि सॅन फ्रान्सिस्को या तीन शहरांना भेट देणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली.जिल्हा परिषदेच्या शाळांतील हे २५ विद्यार्थी शुक्रवारी मुंबईहून अमेरिकेच्या दौर्‍यासाठी रवाना होणार आहेत. यापूर्वी ५० विद्यार्थ्यांनी इस्रोचा दौरा पूर्ण केला आहे.

नासा आणि इस्रोसाठी निवड न झालेल्या ५० विद्यार्थी व १० शिक्षकांसाठी दिल्लीतील राष्ट्रपती भवनासह इतर शैक्षणिक ठिकाणांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे.'पुणे मॉडेल स्कूल' प्रकल्पांतर्गत आयोजित या शैक्षणिक दौर्‍यात विद्यार्थी वॉशिंग्टन डी.सी. येथे तीन दिवस राहणार आहेत. ते नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियम, अर्थ इन्फॉर्मेशन सेंटर, तसेच नासा मुख्यालयाला भेट देणार आहेत. भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा यांची भारतीय दूतावासात भेट घेणार आहेत. त्यानंतर ऑरलॅंडो येथील नासा, केनेडी स्पेस सेंटरला भेट देऊन तेथील शास्त्रज्ञांशी संवाद साधणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande