छ.संभाजीनगर : रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळ्याास प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर, 13 नोव्हेंबर (हिं.स.)।सुलीभंजन, ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर येथे रामानंद संप्रदाय यांच्यावतीने आयोजित परमपूज्य रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळ्याास प्रारंभ झाला.यावेळी कन्नड विधानसभा मतदार
रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळ्याास  प्रारंभ


छत्रपती संभाजीनगर, 13 नोव्हेंबर (हिं.स.)।सुलीभंजन, ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर येथे रामानंद संप्रदाय यांच्यावतीने आयोजित परमपूज्य रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळ्याास प्रारंभ झाला.यावेळी कन्नड विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना आमदार संजना जाधव यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना आमदार संजय जाधव म्हणाल्या की,या सोहळ्यात सहभागी होताना अध्यात्मिक वातावरण, भक्तीभावाने भरलेली सभा आणि संतचरणांचा स्पर्श यामुळे मन प्रसन्न झाले. पूजनीय महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेत नतमस्तक झाले. यावेळी अंतःकरणातून एक वेगळीच शांती, समाधान आणि सकारात्मक ऊर्जेची अनुभूती झाली. या प्रसंगी मिळालेली अध्यात्मिक प्रेरणा आगामी समाजकार्यात निश्चितच नवी दिशा आणि प्रेरणादायी ऊर्जा देईल. संतांच्या कृपेने समाजसेवेचा प्रवास अधिक दृढ आणि फलदायी व्हावा, हीच प्रार्थना.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande