लातूर - मंत्री बाबासाहेब पाटील, संजय बनसोडे राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक
लातूर, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या स्टार प्रचारकांच्या यादीत लातूर जिल्ह्यातील सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि माजी मंत्र
लातूर


लातूर, 13 नोव्हेंबर (हिं.स.)।

नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या स्टार प्रचारकांच्या यादीत लातूर जिल्ह्यातील सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि माजी मंत्री संजय बनसोडे यांना संधी मिळाली आहे.

ही निवड झाल्यानंतर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मान्यतेने आगामी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये माझी निवड केल्याबद्दल पक्षश्रेष्ठींचे मनःपूर्वक आभारी आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांची वैचारिक व सर्वसमावेशक, पुरोगामी, परिवर्तनवादी समाजाभिमुख भूमिका आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, तळागाळातील जनसामान्यांपर्यंत परिणामकारक व प्रभावीरीत्या पोहोचवणार असा विश्वास या निमित्ताने देतो.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande