
नांदेड, 13 नोव्हेंबर (हिं.स.)।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.
स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये नांदेड जिल्ह्याची लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्यातील आमदारांना विविध पक्षांच्या वतीने स्टार प्रचारक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अलीकडेच शिवसेनेची यादी जाहीर करण्यात आली होती या यादीमध्ये नांदेडचे आमदार हेमंत पाटील आमदार आनंद बोंढारकर आमदार बालाजी कल्याणकर यांचाही समावेश आहे या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे खासदार अशोक चव्हाण स्टार प्रचारक आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis