नांदेड - शेतकरी सेना प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद इंगोले यांना मातृशोक
नांदेड, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। शिवसेना (शिंदे गट) प्रणित शेतकरी सेना प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद इंगोले व सेंद्रिय शेती चळवळीचे खंदे समर्थक श्री. भगवान इंगोले (रा. मालेगाव, ता. अर्धापूर, जि. नांदेड) यांच्या मातोश्री कै. गयाबाई रामजी इंगोले (वय ९०) या
अ


नांदेड, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। शिवसेना (शिंदे गट) प्रणित शेतकरी सेना प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद इंगोले व सेंद्रिय शेती चळवळीचे खंदे समर्थक श्री. भगवान इंगोले (रा. मालेगाव, ता. अर्धापूर, जि. नांदेड) यांच्या मातोश्री कै. गयाबाई रामजी इंगोले (वय ९०) यांचे दुःखद निधन झाले आहे.

त्या प्रजापती ब्रह्मकुमारी संस्थेच्या सक्रिय सदस्य होत्या. ओम् शांति च्या माध्यमातून मालेगाव परिसरात ऊर्जादायी चळवळ कै. गयाबाई इंगोले यांनी उभी केली.

आयुष्यभर साधेपणा, सेवाभाव आणि अध्यात्म यांचे मूर्त रूप बनून त्यांनी आपले जीवन समाजकार्याला अर्पण केले. त्यांचे पार्थिव गुरुवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देहदानासाठी सुपूर्द करण्यात आले

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande