आ.हेमंत पाटील, आ. बोंढारकर नांदेड जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी
नांदेड, 13 नोव्हेंबर, (हिं.स.)। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था - नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या वतीने देगलूर, बिलोली, कुंडलवाडी, कंधार, लोहा, मुखेड निवडणूक प्रभारी म्हणून शिवसेना उपनेते तथा मंत्री विधानपरिष
अ


नांदेड, 13 नोव्हेंबर, (हिं.स.)। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था - नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या वतीने देगलूर, बिलोली, कुंडलवाडी, कंधार, लोहा, मुखेड निवडणूक प्रभारी म्हणून शिवसेना उपनेते तथा मंत्री विधानपरिषद गटनेते आमदार हेमंतभाऊ पाटील व आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षाच्या वतीने यासंदर्भात आज ही माहिती देण्यात आली आहे

भोकर, मुदखेड, उमरी, धर्माबाद निवडणूक प्रभारी म्हणून आमदार आनंदराव पाटील बोंढारकर व आमदार बालाजीराव कल्याणकर आणि हदगाव, हिमायतनगर, किनवट निवडणूक प्रभारी म्हणून आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांची निवड करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande