इस्लामाबाद बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकेच्या क्रिकेट संघाकडून सुरक्षेच्या चिंता व्यक्त
इस्लामाबाद, 13 नोव्हेंबर (हिं.स.)सध्या पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या श्रीलंकेच्या क्रिकेट संघातील आठ क्रिकेटपटू सुरक्षेच्या कारणास्तव मायदेशी परतू शकतात. इस्लामाबादमध्ये झालेल्या मोठ्या बॉम्बस्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला होता आणि अनेक जण जखमी झाले हो
इस्लामाबाद बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकेच्या क्रिकेट संघाकडून सुरक्षेच्या चिंता व्यक्त


इस्लामाबाद, 13 नोव्हेंबर (हिं.स.)सध्या पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या श्रीलंकेच्या क्रिकेट संघातील आठ क्रिकेटपटू सुरक्षेच्या कारणास्तव मायदेशी परतू शकतात. इस्लामाबादमध्ये झालेल्या मोठ्या बॉम्बस्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला होता आणि अनेक जण जखमी झाले होते. श्रीलंकेचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे.

तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेनंतर श्रीलंकेचा संघ पाकिस्तान आणि झिम्बाब्वेसोबत तिरंगी मालिका खेळणार होता. पण आता आठ क्रिकेटपटूंनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. मायदेशी परतणाऱ्या क्रिकेटपटूंच्या जागी नवीन क्रिकेटपटू पाठवले जाऊ शकतात. रावळपिंडी इस्लामाबादच्या जवळ असल्याने क्रिकेटपटूंनी आपल्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली आणि मायदेशी परतण्याची इच्छा व्यक्त केली. पण पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) चे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी श्रीलंकेच्या संघाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना पूर्ण सुरक्षेचे आश्वासन दिले.

२००९ मध्ये लाहोरमध्ये श्रीलंकेच्या संघाच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक क्रिकेटपटू जखमी झाले आणि पाकिस्तानी सुरक्षा कर्मचारी ठार झाले. त्या हल्ल्यानंतर, जवळजवळ एक दशक परदेशी संघांनी पाकिस्तानचा दौरा केला नाही आणि पाकिस्तानला त्यांचे घरचे सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळण्यास भाग पाडले गेले.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande