आशियाई तिरंदाजी स्पर्धेत भारतीय कंपाउंड संघाला २ सुवर्णपदके
ढाका, 13 नोव्हेंबर (हिं.स.)ढाका येथे सुरू असलेल्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेत भारताने दोन सुवर्णांसह तीन पदके जिंकली. तिन्ही पदके कंपाउंड प्रकारात आली. प्रथम, ज्योती सुरेखा, दीपशिखा आणि प्रीतिका प्रदीप यांच्या भारतीय संघाने महिलांच्या अंतिम फेरीत कोर
आशियाई तिरंदाजी स्पर्धेत भारतीय कंपाउंड संघाला २ सुवर्णपदके


ढाका, 13 नोव्हेंबर (हिं.स.)ढाका येथे सुरू असलेल्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेत भारताने दोन सुवर्णांसह तीन पदके जिंकली. तिन्ही पदके कंपाउंड प्रकारात आली. प्रथम, ज्योती सुरेखा, दीपशिखा आणि प्रीतिका प्रदीप यांच्या भारतीय संघाने महिलांच्या अंतिम फेरीत कोरियाचा २३६-२३४ असा पराभव केला. या तिघांनी चांगली कामगिरी करत कोरियाच्या पार्क येरिन, ओह युह्यून आणि जंग्यून पार्क यांना पराभूत केले.

त्यानंतर, कंपाउंड मिश्र संघाने अंतिम फेरीत यजमान बांगलादेशचा १५३-१५१ असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. या संघात अभिषेक वर्मा आणि दीपशिखा यांचा समावेश होता. यामुळे भारताचे पाच पदके निश्चित झाली आहेत आणि आणखी सात पदकांसाठी स्पर्धा सुरू आहे. भारतीय संघाने कंपाउंड पुरुष संघाच्या अंतिम फेरीत एका गुणाने सुवर्णपदक हुकले. त्यांना कझाकिस्तानकडून २३०-२२९ असा पराभव सहन लागला. भारतीय संघात अभिषेक वर्मा, साहिल राजेश जाधव आणि प्रथमेश फुगे यांचा समावेश होता, तर कझाकस्तान संघात दिलमुखमेट मुसा, बुन्योद मिर्झामेतोव आणि आंद्रेई युट्युन यांचा समावेश होता.

रिकर्व्ह प्रकारात, यशदीप भोगे आणि अंशिका कुमारी या नवीन मिश्र जोडीने बांगलादेशचा ५-१ असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. पण त्यांना चिनी तैपेईकडून ०-६ असा पराभव पत्करावा लागला. आता त्यांचा सामना कोरियाशी होणार आहे. वैयक्तिक स्पर्धांमध्ये, अंकिता भकत, दीपिका कुमारी आणि संगीता या तिघांनीही महिला रिकर्व्ह उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे, ज्यामुळे भारतासाठी किमान एक पदक निश्चित झाले आहे. पुरुषांमध्ये, धीरज बोम्मदेवरा आणि राहुल यांनी रिकर्व्ह उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. कंपाउंड महिलांमध्ये, प्रितिका प्रदीप आणि ज्योती सुरेखा वेन्नम यांनीही अंतिम चारमध्ये स्थान मिळवले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande