'तो' खून स्मार्ट शेफ चाकूने मृताच्या हातावर ओम नाव गोंदलेले
अमरावती, 13 नोव्हेंबर (हिं.स.) शिराळा गावालगतच्या एका शेतातअनोळखी युवकाच्या खून प्रकरणात गुन्हे शाखेच्या पथकाला घटनास्थळापासून काही अंतरावर स्मार्ट शेफ कंपनीचा चाकू आणि खर्रा मिळून आला. स्मार्ट शेफ चाकू महागड्या हॉटेलमध्ये वापरला जातो. तसेच जो खर्
'तो' खून स्मार्ट शेफ चाकूने मृताच्या हातावर ओम नाव गोंदलेले


अमरावती, 13 नोव्हेंबर (हिं.स.)

शिराळा गावालगतच्या एका शेतातअनोळखी युवकाच्या खून प्रकरणात गुन्हे शाखेच्या पथकाला घटनास्थळापासून काही अंतरावर स्मार्ट शेफ कंपनीचा चाकू आणि खर्रा मिळून आला. स्मार्ट शेफ चाकू महागड्या हॉटेलमध्ये वापरला जातो. तसेच जो खर्रा मृताजवळ सापळला तो मध्यप्रदेशमध्ये मिळत असल्यामुळे पोलिसांचे वेगवेगळे पथक मध्यप्रदेशच्या सीमेवर मृताची ओळख पटविण्याच्या प्रयत्नात आहेत. तसेच मृताच्या एका हातावर ओम असे नाव गोंदल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.शिराळा गावालगत शुक्रवारी सकाळी एका शेतात युवकाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या प्रकरणात गुन्हे शाखेचे पथक कसून तपास करित आहे. आतापर्यंत पथकाने २५० ते ३०० च्या वर सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. तसेच महाराष्ट्रासह मध्यप्रदेश येथील बेपत्ता युवकांची माहिती घेतली, परंतु काही ठोस माहिती पोलिसांच्या हाती लागली नाही. त्यानंतर मृताचे जळालेल्या अवस्थेतील फोटो व रेखाचित्र मध्यप्रदेशच्या सीमेलगतच्या प्रत्येक गावात जाऊन पोलीस हे नागरिकांना दाखवित आहेत. प्रत्येक गावातील मुख्य चौकात ते चिकटविले जात आहे. तसेच सोशल मीडियावरसुध्दा ते व्हायरल केले. परंतुअद्यापही मृताची ओळख पटली नाही. त्यामुळे पुन्हा घटनास्थळाची पाहणी केली असता मृतालगत एक खर्रा मिळाला. तसेच काही अंतरावर स्मार्ट शेफ कंपनीचा चाकू मिळाल्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने तपासाला दिशा दिलेली आहे. मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरातील हॉटेलमध्ये स्मार्ट शेफ कंपनीचा चाकू वापरला जातो. परंतु जो खर्रा मिळाला तसा खर्रा मध्यप्रदेशमध्ये मिळतो. त्यामुळे पोलीस मध्यप्रदेश सीमेलगतच्या प्रत्येक गावातील चौकात संबंधित चाकूबाबत चौकशी करीत आहेत. तसेच खर्रामध्ये वापरलेला सागर तंबाखू कोणत्या गावात जास्त वापरला जातो याबाबत पोलीस कसून माहिती घेत आहेत. त्यामुळे लवकरच या प्रकरणात मृतकची ओळख पटविण्यास यश मिळविण्याचा विश्वास पोलिसांना आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande