
बीड, 13 नोव्हेंबर (हिं.स.)।
जिल्ह्यातील प्रलंबित वाहतूक दंडाची वसुली करण्यासाठी बीड पोलिस दलाने विशेष मोहीम राबवली.
पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा वाहतूक शाखेच्या समन्वयातून ही मोहीम पार पडली.
या मोहिमेत पाडळशिंगी टोलनाका, बार्शी नाका, साठे चौक वडवणी, टोल नाका, चुंभळी फाटा पाटोदा, गोमाळवाडा
फाटा शिरूर, धारूर टोल नाका, फर्दापूर टोल नाका, परभणी टी पॉइंट माजलगाव, इटके कॉर्नर परळी व अंभोरा चेकपोस्ट या ठिकाणी एकाच वेळी नाकेबंदी करण्यात वाहनधारकांकडून प्रलंबित वाहतूक दंडासह एकूण ११ लाख ८ हजार ९५० आली. या कारवाईदरम्यान १,३४० रुपयांची वसुली करण्यात आली.
ही मोहीम अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर आणि अपर पोलिस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis