अमरावतीत ६४ वी हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा उद्यापासून
अमरावती, 13 नोव्हेंबर (हिं.स.) महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६४ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी स्थानिक डॉ. पंजाबराव देशमुख - वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृह येथे शुक्रवा
अमरावतीत ६४ वी हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा उद्यापासून  रसिक प्रेक्षकांना लुटता येणार नाटकांचा आनंद


अमरावती, 13 नोव्हेंबर (हिं.स.)

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६४ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी स्थानिक डॉ. पंजाबराव देशमुख - वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृह येथे शुक्रवारपासून (ता. १४) सुरू होत आहे. यंदा प्रथमच अतिशय सुसज्ज अशा या नाट्यगृहात स्पर्धेचे नाटक सादर करता येणार असल्यामुळे स्पर्धकांमध्ये अतिशय उत्सुकता असून आनंद सुद्धा व्यक्त केला जात आहे. रसिक प्रेक्षकांना देखील या नाट्यगृहात अतिशय सुंदर वातावरणात नाट्यानुभव घेता येणार आहे. १४ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबरदरम्यान रोज संध्याकाळी ७ वाजता नाटकाचे प्रयोग सादर होणार आहेत.सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पारं पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी नमूद केलेले आहे. या स्पर्धेमध्ये एकूण १६संघांचा सहभाग असून अमरावती जिल्ह्यातील संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. राज्यनाट्य स्पर्धे तील सर्व नाटकांना जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे आणि हौशी रंगकर्मीचा उत्साह वाढवावा, असे आवाहन संचालक बिभीषण चवरे यांनी केलेले आहे. या स्पर्धेत दरवर्षी अमरावती केंद्रावर अनेक दर्जेदार नाटकांचे सादरीकरण होत असते आणि प्रथम व द्वितीय क्रमांकाचे नाटकं अंतिम स्पर्धेत सहभागी होतात. स्पर्धेकरिता तिकिटांचा दर अतिशय अल्प असून रोज १० रुपय आणि १५ रुपये असणार आहे. यावर्षी सुद्धा एकंदर १६ दर्जेदार नाटकांचे सादरीकरण होणार आहे. त्यामध्ये १४ ला माणुसकी १५ ला श्वेतकर्णी श्यामवर्णी, १६ ला एकेक पान गळावया, १७ ला मीच तो, १८ ला ओसीस, १९ ला कटपीस सासू, २० ला जेंडर अन् आयडेंटिटी, २१ ला व व्हल्वर अँड द लिटिल गर्ल, २२ ला उत्तरायण, २३ ला सखी ग सखी, २४ ला वारकरी, २५ ला दशानंन, २६ ला तलाई कुंतल, २७ ला जनावर व्हाया माणूस २८ ला चक्रव्यूह, २९ ला अपराजित व त्यानंतर कार्यक्रमाचे समापन करण्यात येईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande