विहिपतर्फे पुण्यात रविवारी ‘सेवाकुंभ’ कार्यक्रम
पुणे, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांच्यातर्फे रमणबाग शाळेत येत्या रविवारी सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत ‘सेवाकुंभ’ हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात विश्व हिंदू परिषदेच्या विद्यार्थ्यांतर्फे विविध कलांच
विहिपतर्फे पुण्यात रविवारी ‘सेवाकुंभ’ कार्यक्रम


पुणे, 13 नोव्हेंबर (हिं.स.)।

विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांच्यातर्फे रमणबाग शाळेत येत्या रविवारी सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत ‘सेवाकुंभ’ हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात विश्व हिंदू परिषदेच्या विद्यार्थ्यांतर्फे विविध कलांचे सादरीकरण यासह त्यांनी बनवलेल्या विविध वस्तूचे प्रदर्शन होणार आहे.याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री आणि केंद्रीय सहसेवा प्रमुख स्वपनकुमार मुखर्जी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे, विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रमंत्री रामचंन्द रामुका, प्रा. अनंत पांडे, उद्योजक नितीन जाधव उपस्थिती राहतील. या कार्यक्रमासाठी पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील विद्यार्थी, महिला आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेतर्फे करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande