
अमरावती, 13 नोव्हेंबर (हिं.स.)
अंजनगाव नगरपरिषद निवडणूकीची लगबग सुरु झाली असून स्थानिक पातळीवर जातिय समीकरण जुळवण्यावर भाजप पक्ष भर देत आहेत. मागिल निवडणुकीत भाजप पक्षाने काॅग्रेस चे माजी नगराध्यक्ष यॅड कमलकांत लाडोळे यांना उमेदवारी देऊन बहुमताने नगरपरिषदेवर सत्ता स्थापन केली होती. यॅड कमलकांत लाडोळे दोन वेळेस थेट जनतेतून नगराध्यक्ष पदी निवडून आले आहेत त्यामुळे त्यांची पकड शहरावर चांगलीच आहे. शिवसेनेचे बळीराम धर्म यांनी नगरसेवक पदाच्या निवडणुकीत कमलकांत लाडोळे यांचा पराभव केला होता. जनतेतून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कमलकांत लाडोळे यांनी देविदास नेमाडे यांचे सुपुत्र प्रविण नेमाडे यांचा पराभव केला. प्रविण नेमाडे हे माजी उपनगराध्यक्ष देविदास नेमाडे यांचे सुपुत्र आहे.देविदास नेमाडे स्थानिक राजकीय धुरंधर नेते असून त्यांना शहरात मानणारा मोठा वर्ग आहे तर लाडोळे आणि नेमाडे हे एकाच समाजाचे म्हणजे बारी समाजांचे असून राजकीय विरोधक आहेत.शहराच्या हद्दीत बारी समाजांचे नऊ हजारांच्या आसपास मतदार असून नगराध्यक्ष पदासाठी निर्णायक मतदार मानल्या जाते. देविदास नेमाडे आणि कमलकांत लाडोळे हे सुरवाती पासून राजकीय परस्पर विरोधी पक्षात भूमिका बजावून आप आपले राजकीय अस्तित्व टिकवून आहेत. मात्र या निवडणुकी दरम्यान देविदास नेमाडे आणि प्रविण नेमाडे पिता पुत्रांनी भाजप पक्ष प्रवेश केल्याने राजकीय परस्पर विरोधी एकाच पक्षात आल्यामुळे भाजप पक्षाचे पारडे जड झाले असले तरी दोन्ही स्थानिक नेत्यांना राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी एकाच पक्षात गटबाजी खेळल्या शिवाय पर्याय उपलब्ध राहणार नाही. त्यामुळे होऊ घातलेल्या निवडणुकीत आप आपल्या उमेदवारांना भाजप पक्षाची उमेदवारी कशी मिळेल यासाठी दोन्ही नेत्यांचे प्रयत्न राहणार आहे.जवळच्या उमेदवारांना उमेदवारी न मिळाल्यास दोन्ही नेते गटबाजीचा संघर्ष करण्याची शक्यता नाकारताही येत नाही.लाडोळे आणि नेमाडे यांचे राजकीय अस्तित्व टिकवून राहणार की तीसराच पक्ष या अंतर्गत राजकीय खेळीत संधी मारणार का?हे चित्र निवडणूक निकालानंतर पष्टच होणार आहे
*लाडोळेची काँग्रेस मध्ये घरवापसी होणार की शिंदे गटात जाणार?*
माजी नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे यांनी तात्कालिक भाजपचे नेते सुनिल देशमुख यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश करुन नगराध्यक्ष पदांची माळ गळ्यात घातली होती त्यामुळे ते सुनिल देशमुख यांचे निकटवर्तीय मानले जाते तर माजी उपनगराध्यक्ष देविदास नेमाडे हे आमदार प्रकाश पाटील भारसाकडे यांचें जुनेच समर्थक आहेत. मा आमदार सुनिल देशमुख पुन्हा काँग्रेस पक्षात घर वापसी झाल्यामुळे लाडोळे यांचे भाजपच्या वरिष्ठ पातळीवर राजकारणात गाॅडफादर नसल्यामुळे त्यांची भाजप पक्षात घुसमट होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे लाडोळे काँग्रेस मध्ये घर वापसी होणार की शिंदे गटाचा धनुष्यबाण हाती घेणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी