युवा स्वाभिमानकडून भाजपला युतीचा प्रस्ताव
अमरावती, 13 नोव्हेंबर (हिं.स.) नगर परिषद व नगर पंचायत निवडणुका जवळ आल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टीची कोअर कमिटीची आढावा बैठक आमदार रवी राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत समर्थ हायस्कुल येथील पँटलुन हॉटेलमध्ये पार
भाजपसोबत युतीसाठी YSP कार्यकर्त्यांचा ठराव  युती न झाल्यास होणार मैत्रीपुर्ण लढत!


अमरावती, 13 नोव्हेंबर (हिं.स.)

नगर परिषद व नगर पंचायत निवडणुका जवळ आल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टीची कोअर कमिटीची आढावा बैठक आमदार रवी राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत समर्थ हायस्कुल येथील पँटलुन हॉटेलमध्ये पार पडली.या बैठकीदरम्यान भाजपसोबत युती करण्यासंदर्भात चर्चा झाली. महाराष्ट्र राज्याचे निवडणूक प्रमुख तथा महसुल मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव युतीचा प्रस्ताव देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. भाजपा हा मोठा भाऊ असल्याने त्यांच्यासोबत युती व्हावी, असा कार्यकर्त्यांचा ठाम आग्रह होता. मात्र, युती न झाल्यास मैत्रीपूर्ण भूमिकेतून सर्व जागांवर युवा स्वाभिमान पार्टी स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल, असा एकमताने ठराव या बैठकीत पारित करण्यात आला.बैठकीस सुनिल राणा, जयंत वानखडे, शैलेंद्र कस्तुरे, ॲड. नंदेश अंबाडकर, विनोद जायलवाल, प्रा. अजय गाडे, समाधान वानखडे, डॉ. आशिष मालू, कमल किशोर मालानी, ज्योती सैरीसे, सोनाली नवले, सुमती ढोके, संजय हिंगासपुरे, शिवदास घुले, गणेशदास गायकवाड, सुखदेव तरडेजा, हरीश चरपे, बाळु इंगाले आदींची प्रमुख उपस्थिती होती.अंतिम युतीसंदर्भातील निर्णय आमदार रवि राणा घेतील, असे प्रवक्ता नाना आमले यांनी स्पष्ट केले. बैठकीस जिल्ह्यातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande