
पुणे, 13 नोव्हेंबर (हिं.स.)।
पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागांमधील आरक्षण निश्चित झाल्यानंतर आता इच्छुक उमेदवारांमध्ये खलबते सुरु झाली आहेत. चारचा प्रभाग असल्याने पॅनेलमध्ये संभावित उमेदवार कोण असतील?, महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागी योग्य उमेदवार कोण असेल यावरून चर्चांना सुरुवात झाली आहे.पुणे महापालिकेत १६५ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. त्यापैकी ८३ जागा या महिलांसाठी आरक्षित आहेत. तर ८३ जागा या खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. त्यामधून देखील महिला उमेदवार निवडणूक लढवू शकतात. प्रभागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि महिला आरक्षण पडले आहे.या आरक्षणांमुळे मातब्बर नगरसेवकांची चांगलीच कोंडी झाली आहे. त्यांना आरक्षित प्रभाग नसल्याने सर्वसाधारण खुल्या गटातून निवडणूक लढवावी लागणार असल्याने समोरच्या पक्षातून तगड्या उमेदवाराचे आव्हान असणार आहे. त्यामुळे अशा प्रभागांमध्ये मोठी लढत दिसण्याची शक्यता आहे. शहरातील अनेक प्रभागांमध्ये ही स्थिती असेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु