
अकोला, 14 नोव्हेंबर (हिं.स.)।संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित श्री संत गजानन महाराज कला महाविद्यालय बोरगांव मंजू यांच्या वतीने आयोजित आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धा मुले व मुली यांचे उद्घाटन स्व. वसंत देसाई स्टेडियम बॉक्सिंग क्रिडांगण अकोला येथे संपन्न झाला.
ही स्पर्धा 14 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर 2025 दरम्यान घेण्यात येत असून संत गाडगेबाबा अमरावती संलग्नित महाविद्यालयातील एकूण 127 मुले आणि मुली मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे.
उद्घाटनिय कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ओमप्रकाश गजाननराव दाळु, सचिव संत गजानन महाराज शिक्षण संस्था अकोला. तसेच उद्घाटक माननीय सतीशचंद्र भट्ट, जिल्हा क्रीडा अधिकारी अकोला,तसेच प्रमुख अतिथी प्राचार्य डॉक्टर देवेंद्र गावंडे,प्राचार्य पुजाताई सपकाळ या वरील सर्व मान्यवरांनी बॉक्सिंग रिंगमध्ये जाऊन बाऊट शुभारंभ करून बॉक्सिंग स्पर्धेला सुरुवात केली.पुढील स्पर्धेला सर्व मान्यवरांनी सर्व खेळाडूंना प्रोत्साहित केले व स्पर्धेत उत्साहात संपन्न होतील असे आश्वासन दिले.विविध महाविद्यालयातील संचालक शारीरिक शिक्षक विभाग प्रमुख उपस्थित होते.या संपूर्ण स्पर्धेचे आयोजन संत गजानन महाराज महाविद्यालय बोरगाव मंजू कर्मचारी,प्राध्यापक वृंद व डॉक्टर गजानन बडे संचालक शारीरिक शिक्षण करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे