अकोल्यात वंचित सह महायुतीतील राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा
अकोला, 14 नोव्हेंबर (हिं.स.) राज्यात सध्या स्थानिक स्वराज संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील रणधुमाळीला सुरुवात झाली आहे.. अकोला जिल्ह्यातील पाच नगरपरिषद आणि एका नगरपंचायतीसाठी निवडणूक होतं आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडी पक्षाने चार नगराध्यक्ष पदासाठी
P


अकोला, 14 नोव्हेंबर (हिं.स.) राज्यात सध्या स्थानिक स्वराज संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील रणधुमाळीला सुरुवात झाली आहे.. अकोला जिल्ह्यातील पाच नगरपरिषद आणि एका नगरपंचायतीसाठी निवडणूक होतं आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडी पक्षाने चार नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार जाहीर केले तर त्या पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानेही तीन ठिकाणचे उमेदवार जाहीर केल्याने.. राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. महायुतीत असलेल्या राष्ट्रवादी कडून एकलो चलो रेची भूमिका यातून समोर आली आहे.. त्यासंदर्भातिल पाहूया एक स्पेशल रिपोर्ट...

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा बिगुल वाजला असुन पहिल्या टप्प्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांचा नारळ फुटला आहे.. दरम्यान राज्यात स्वबळाचे नारे उंचावल्याचे एकंदरीत चित्र आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचा धर्म स्थानिक पातळीवर पाळल्याच जाईल असे वाटत नाही. अनके ठिकाणी स्थानिक नेत्यांनी युती आणि आघाडीऐवजी एकला चलो रेचा नारा दिला जात आहे. त्यात आता अकोला जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीने पुढाकार घेत आपले चार उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी जाहीर केले आहेत.. त्यामुळे वंचितने ऐकला चलो रे चा नारा दिला असतांनाच महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही जिल्ह्यातील तीन ठिकाणी म्हणजेच तेल्हारा, अकोट आणि बार्शीटाकळी येथील उमेदवार जाहीर करत महायुती शिवाय लढण्याचा निर्णय घेतल्याची शक्यता आहे.. त्यामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय घडामोडी वेगळी भूमिका दाखवत आहेत. दरम्यान अद्याप पर्यंत काँग्रेस आणि भाजपने आपला उमेदवार घोषित केला नसून महाविकास आघाडी एकत्रित जिल्ह्यातील निवडणूक लढण्याचे संकेत आहेत. तर महायुतीत एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकला चलो रे चा नारा देण्याची शक्यता आहे.

वंचित कडून उमेदवार आधीच जाहीर करण्यात आल्याने वंचित एकटाच हा किल्ला लढवत आहे.. वंचित बहुजन आघाडीचे अकोला जिल्ह्यातील सहापैकी नगराध्यक्षपदाचे 4 उमेदवार जाहीर झाले आहे. घोषित केलेल्या चारपैकी दोन ठिकाणी मुस्लिमांना संधी देण्यात आली. यात एका नगर पंचायत आणि 3 नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर करण्यात आलेत. तेल्हारा नगरपरिषदसाठी वंचित बहुजन आघाडीची शेतकरी पॅनल आणि तेल्हारा विकासमंच सोबत युतीची घोषणा केली आहे..

राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणूकीमुळे निवडणूकीचा खऱ्या अर्थाने बिगुल वाजला आहे.. याच निवडणूकिवरून आगामी निवडणूकीबाबत अंदाज बांधले जात आहे.. अकोला जिल्ह्यातील लढतीचे चित्र अद्यापही स्पष्ट नसलं तरी पक्षांच्या भाऊ गर्दीत मात्र अनेकांना एकलो चलो रे चं ब्रीद पुढे घेऊन जाण्याची इच्छा यावरून दिसत आहे..

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande