अकोला - अतिवृष्टीबाधित शेतक-यांना मदतीचे वितरण
अकोला, 14 नोव्हेंबर, (हिं.स.)। जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी, पावसाने झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने एकूण 2 लक्ष 70 हजार शेतक-यांना 255 कोटी 15 लक्ष 67 ह. मदत वितरण, तसेच अतिवृष्टी व पुरामुळे बाधित 2 लक्ष 21 हजार 707 शेतक-यांना रब्ब
अकोला - अतिवृष्टीबाधित शेतक-यांना मदतीचे वितरण


अकोला, 14 नोव्हेंबर, (हिं.स.)। जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी, पावसाने झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने एकूण 2 लक्ष 70 हजार शेतक-यांना 255 कोटी 15 लक्ष 67 ह. मदत वितरण, तसेच अतिवृष्टी व पुरामुळे बाधित 2 लक्ष 21 हजार 707 शेतक-यांना रब्बी हंगामासाठी बियाणे व इतर बाबींकरिता प्रतिहेक्टरी रू. 10 हजार रू. प्रमाणे 191 कोटी 43 लक्ष डीबीटी पद्धतीने मदत वितरण झाले.

अतिवृष्टी आणि पुरामुळे निर्माण झालेल्या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शासनाने मदत व सवलती जाहीर केल्या. जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनीही यासंदर्भात बैठका घेऊन सविस्तर पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यानुसार ऑगस्ट-सप्टेंबरमधील नुकसानीच्या अनुषंगाने मदत वितरण व रब्बी हंगाम बियाणे आदींसाठी मदतीची वितरण प्रक्रिया प्रशासनाने राबवली.

ऑगस्टमधील अतिवृष्टीने शेतीपिकांचे (2 हे. पर्यंत) झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने 1 लक्ष 1 हजार 560 शेतक-यांना 77 कोटी 34 लक्ष 99 हजार इतका निधी वाटप आहे. तालुकानिहाय निधीवाटप असा : अकोट (21 हजार 254 शेतकरी, 13 कोटी 14.42 लक्ष), तेल्हारा (6 हजार 417 शेतकरी, 2 कोटी 92.14 लक्ष), बाळापूर (766 शेतकरी, 44.27 लक्ष), पातूर (2 हजार 796 शेतकरी, 1 कोटी 59.65 लक्ष), अकोला (35 हजार 145 शेतकरी, 30 कोटी 93.03 लक्ष), मूर्तिजापूर (35 हजार 182 शेतकरी, 28 कोटी 31.48 लक्ष).

सप्टेंबरमधील अतिवृष्टीने शेतीपिकांचे (2 हे. पर्यंत) झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने 1 लक्ष 68 हजार 932 शेतक-यांना 177 कोटी 80 लक्ष 68 हजार इतका निधी वाटप आहे. तालुकानिहाय निधीवाटप असा : अकोट (21 हजार 175 शेतकरी, 25 कोटी 16 लक्ष 43 ह.), तेल्हारा (27 हजार 333 शेतकरी, 24 कोटी 44 लक्ष 39 ह.), बाळापूर (33 हजार 588 शेतकरी, 26 कोटी 88 लक्ष 65 ह.), पातूर (24 हजार 925 शेतकरी, 22 कोटी 41 लक्ष 70 ह.), अकोला (14 हजार 11 शेतकरी, रक्कम 11 कोटी 38 लक्ष 57 ह.), बार्शिटाकळी (31 हजार 585 शेतकरी, 29 कोटी 4 ल. 38 ह.), मूर्तिजापूर 16 हजार 315 शेतकरी, 38 कोटी 46 ल. 56 ह.).

अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतक-यांना रब्बी हंगामासाठी बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरिता प्रतिहेक्टरी रू. 10 हजार रू. प्रमाणे डीबीटी पद्धतीने मदत वितरण (दि. 14 नोव्हेंबरपर्यंत) 2 लक्ष 21 हजार 707 शेतक-यांना 191 कोटी 43 लक्ष इतकी मदत करण्यात आली आहे. तालुकानिहाय – अकोला (37 हजार 848 शेतकरी, 37 कोटी 36 लक्ष 6 ह.), अकोट (32 ह. 260 शेतकरी, 27 कोटी 19 लक्ष 38 ह.), बाळापूर (33 हजार 789 शेतकरी, 28 कोटी 74 लक्ष 82 हजार), बार्शिटाकळी ( 27 हजार 345 शेतकरी, 27 कोटी 51 लक्ष 73 ह.), मूर्तिजापूर (40 हजार 644 शेतकरी, 28 कोटी 62 लक्ष 34 ह.), पातूर (22 हजार 228 शेतकरी, 19 कोटी 85 लक्ष 4 ह.), तेल्हारा 27 हजार 593 शेतकरी (22 कोटी 12 लक्ष 74 ह.).

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande