बिहार निकालानंतर सोमय्यांची ठाकरे बंधूंवर जहरी टीका!
अकोला, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। बिहार निवडणूकिच्या निकालावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.. जे महाराष्ट्रात गोल टोपी लावून फिरतात त्यांना आता बिहारच्या निवडणूक निकालावरून अक्कल येणार.. एक ठाकरे गोल टोपी लावून फिरायचे
प


अकोला, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। बिहार निवडणूकिच्या निकालावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.. जे महाराष्ट्रात गोल टोपी लावून फिरतात त्यांना आता बिहारच्या निवडणूक निकालावरून अक्कल येणार.. एक ठाकरे गोल टोपी लावून फिरायचे आता दुसरे ठाकरेही गोल टोपी लावून फिरत आहेत.. असा टोला किरीट सोमय्या यांनी ठाकरे बंधूंना लगावला आहे.. ते आज अकोल्यात माध्यमातून बोलत होते.. तर त्यांनी बांग्लादेशीच्या मुद्द्यांवरून गंभीर आरोप केले आहेत.. हिरवे रंग ज्यामुळे दिल्ली त बॉम्ब स्फोट झाला.. आम्ही या बांग्लादेशीच्या विरोधात युद्ध पुकारले आहे. तर विरोधक हिरवे झेंडे घेऊन येतात.. आणि विरोध करतात.. आज बिहार निवडणूक ही बांग्लादेश मुद्द्यावरून जिंकलो आगामी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकही महायुती जिंकेल असा विश्वासही किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला.. तर किरीट सोमय्या यांनी बांग्लादेशीच्या मुद्द्यांवर गंभीर टीका यावेळी केली आहे. आज इथले मुस्लिम आक्रमक तेररिस्ट झाले आहेत.. ही गंभीर बाब असल्याचं ते म्हणाले.. वेगवेगळ्या ठिकाणी एटीएस कडून कारवाई सुरू असल्याच त्यांनी म्हटलं आहे.. तर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांग्लादेशी मतदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.. पुढच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्व बांग्लादेशी मतदार हद्दपार होणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.. यांची मत गेली आहे.. हे काय मतचोरीचे आरोप लावणार असेही सोमय्या म्हणाले..

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande