अकोला : लाडक्या सुनेसाठी धावून आली शिवसेना
अकोला, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। :एकनाथ शिंदे यांनी राज्यभर राबविलेल्या ‘लाडकी बहीण '' , नंतर लाडकी सून’ या योजनेअंतर्गत सुनेवर होणाऱ्या छळाला थांबवून तिला तत्काळ मदत व न्याय मिळावा, यासाठी शिवसेना-शिंदे गट सक्रियपणे पुढाकार घेत आहे.अकोल्यात अशाच एका
P


अकोला, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। :एकनाथ शिंदे यांनी राज्यभर राबविलेल्या ‘लाडकी बहीण ' , नंतर लाडकी सून’ या योजनेअंतर्गत सुनेवर होणाऱ्या छळाला थांबवून तिला तत्काळ मदत व न्याय मिळावा, यासाठी शिवसेना-शिंदे गट सक्रियपणे पुढाकार घेत आहे.अकोल्यात अशाच एका प्रकरणात सुशिक्षित तरुणाकडून पत्नीवर सातत्याने छळ व मारहाण केली जात असल्याची माहिती समोर आली.

पीडित महिलेने हा प्रकार शिंदे गटातील एका पदाधिकाऱ्याला सांगितल्यानंतर, तिला मानसिक आधार देण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते तत्काळ पुढे सरसावले.महिलेची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिच्यासोबत उभे राहत तिला धीर दिला. पोलिसांनीही तात्काळ कारवाई करत, महिलेला मारहाण करणाऱ्या युवकाला ताब्यात घेतले आहे.या संपूर्ण प्रकरणामुळे, अत्याचारग्रस्त महिलेला मोठा मानसिक आधार मिळाला असून लाडकी सून योजनेचे प्रत्यक्ष परिणाम लोकांसमोर दिसून आले आहेत.शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या तात्काळ हस्तक्षेपाने आणखी एक महिला अन्यायातून बाहेर येत असल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande